23 September 2020

News Flash

वॉर्नर तळपला!

डेव्हिड वार्नर जेव्हा आपल्या दणकेबाज शैलीने गोलंदाजांची दाणादाण उडवतो तेव्हा तो संघाला जिंकवूनच देत असतो, हे पाहण्यात आले आहे.

| April 23, 2015 04:09 am

डेव्हिड वार्नर जेव्हा आपल्या दणकेबाज शैलीने गोलंदाजांची दाणादाण उडवतो तेव्हा तो संघाला जिंकवूनच देत असतो, हे पाहण्यात आले आहे. बुधवारीही वार्नर तळपला आणि त्याच्या दणकेबाज फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने कोलकातावर डकवर्थ-लुइस नियमांनुसार १६ धावांनी विजय मिळवला. दमदार सलामीच्या जोरावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करतना १७६ धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकातापुढे १२ षटकांत ११८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. पण कोलकाताला १०१ धावाच करता आल्या आणि त्यांना सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला.
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला कर्णधार गौतम गंभीरच्या (४) रुपात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर रॉबिन उथप्पा (३४) आणि मनीष पांडे (नाबाद ३३) यांनी दमदार खेळ करत संघाला विजयासमीप नेण्याचा प्रयत्न केला. पण उथप्पा बाद झाल्यावर कोलकाताने ठराविक फरकाने फलंदाज गमावले आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना वॉर्नरने कोलकाताच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. वार्नरला यावेळी शिखर धवनची चांगली साथ लाभली आणि या दोघांनी १३० धावांची दणदणीत सलामी दिली. वार्नरने ५५ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ९१ धावांची तडफदार खेळी साकारली. धवनने संयत खेळ करत ४६ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५४ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ४ बाद १७६ (डेव्हिड वॉर्नर ९१, शिखर धवन ५४ ; मार्ने मॉर्केल २/३१) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स : १२ षटकांत ४ बाद १०१ (रॉबिन उथप्पा ३४, मनीष पांडे नाबाद ३३; रवी बोपारा १/७)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 4:09 am

Web Title: ipl 2015 srh beat kkr by 16 runs
टॅग Ipl
Next Stories
1 दिल्ली जिंकण्यासाठी मुंबई उत्सुक
2 जॉन्सन आणि अक्षर आमच्या विजयाचे शिल्पकार – सेहवाग
3 योग्य समन्वय हेच यशाचे गमक – धोनी
Just Now!
X