10 April 2020

News Flash

‘आयपीएलमधील गैरहजेरीने नुकसान’

आयपीएल स्पर्धा खेळाडूंना स्वत:चे कौशल्य परिपक्व करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे, मात्र या स्पर्धेत सहभाग नसल्यामुळे पाकिस्तान व इंग्लंडच्या खेळाडूंचे खूप मोठे नुकसान होत आहे,

| May 6, 2015 03:29 am

आयपीएल स्पर्धा खेळाडूंना स्वत:चे कौशल्य परिपक्व करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे, मात्र या स्पर्धेत सहभाग नसल्यामुळे पाकिस्तान व इंग्लंडच्या खेळाडूंचे खूप मोठे नुकसान होत आहे, असे पाकिस्तानचे ज्येष्ठ कसोटीपटू वासिम अक्रम यांनी येथे सांगितले.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अक्रम म्हणाले,की अनेक जण या स्पर्धेकडे आर्थिक फायदा म्हणून पाहतात. मात्र या स्पर्धेतील अनेक सामन्यांना ५० ते ६० हजार प्रेक्षक उपस्थित असतात. एवढय़ा मोठय़ा चाहत्यांसमोर आपली शैली सिद्ध करण्यासाठी उदयोन्मुख खेळाडूंना उत्तम संधी असते. तसेच खेळाडूंना आत्मविश्वास उंचावण्यासाठी ही स्पर्धा उत्तम व्यासपीठ आहे. फलंदाज व गोलंदाजांना या स्पर्धेतून भरपूर शिकावयास मिळते. पुढील आयपीएलमध्ये पाकिस्तान व इंग्लंडचे खेळाडू सहभागी होतील अशी मला आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2015 3:29 am

Web Title: ipl absence suffer lost
टॅग Ipl
Next Stories
1 कोलकातासमोर हैदराबादची शरणागती
2 बंगळुरुची घसरगुंडी..
3 दिल्लीची मुंबईवारी यशस्वी होणार?
Just Now!
X