ऑस्ट्रेलियाचा विश्वविजयी संघातील वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील कडक उन्हाळा आणि व्यस्त राष्ट्रीय सामन्यांच्या कार्यक्रमामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्सने त्याला गेल्या मोसमात एक लाख अमेरिकन डॉलर्स मोजत करारबद्ध केले होते आणि या मोसमासाठी त्याला संघात कायम ठेवण्यात आले होते. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचे आहे. त्यानंतर तो इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस कसोटी मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे या सर्व व्यस्त कार्यक्रमामध्ये दुखापत होऊ नये यासाठी हेझलवूडने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पध्रेत हेझलवूडने आपल्या गोलंदाजीने सर्वाना प्रभावित केले होते. त्याने पाकिस्तानविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या.