01 October 2020

News Flash

श्रीशांतला वगळण्यामागे ‘थप्पड’ प्रकरण नाही -द्रविड

हरभजन सिंग व एस. श्रीशांत यांच्यात मैदानावर पुन्हा एकदा पंगा होईल, या भीतीने श्रीशांतला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वगळण्यात आले, या चर्चेला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल

| April 19, 2013 03:37 am

हरभजन सिंग व एस. श्रीशांत यांच्यात मैदानावर पुन्हा एकदा पंगा होईल, या भीतीने श्रीशांतला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वगळण्यात आले, या चर्चेला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडने पूर्णविराम दिला. खेळाडूंवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी संघ व्यवस्थापनाने हे पाऊल उचलले, असे द्रविडने स्पष्ट केले.  तो म्हणाला, ‘‘श्रीशांतच्या वगळण्यामागे ‘थप्पड’ प्रकरणाचा कोणताही संबंध नाही. श्रीशांतने चार सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. अद्याप आयपीएल स्पर्धेला ४०पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे त्याची तंदुरुस्ती हाच त्याबाबतचा उद्देश होता.’’ २००८मध्ये घडलेले ‘थप्पड’ प्रकरण हे पूर्वनियोजित होते. हरभजन हा दगाबाज आहे, असे सांगत श्रीशांतने हे प्रकरण उकरून काढले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2013 3:37 am

Web Title: no slap matter behind exclusion of shrishant dravid
टॅग Ipl,Sports
Next Stories
1 रॉयल्स नंबर १!
2 पंजाबचे बल्ले-बल्ले!
3 ‘नंबर १’ गेम
Just Now!
X