07 July 2020

News Flash

पंजाबचा सहज विजय!

गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीवर कळस चढवण्याचे काम फलंदाजांनी केल्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर पाच विकेट्सनी सहज विजय मिळवला. दिल्लीचे १२१ धावांचे माफक आव्हान पंजाबने १८

| April 24, 2013 04:12 am

गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीवर कळस चढवण्याचे काम फलंदाजांनी केल्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर पाच विकेट्सनी सहज विजय मिळवला. दिल्लीचे १२१ धावांचे माफक आव्हान पंजाबने १८ चेंडू राखून पार करत या मोसमातील चौथ्या विजयाची नोंद केली.
एकतर्फी झालेल्या लढतीत पंजाबने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. हरमीत सिंग आणि प्रवीण कुमारच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीला १२० धावांवर रोखल्यानंतर पंजाबने सुरेख सुरुवात केली. मनदीप सिंग (२४) आणि ल्युक पोमेर्सबॅच (१८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावा काढत पंजाबला विजयासमीप आणले. पण एकापाठोपाठ तीन विकेट्स तंबूत परतल्यानंतर डेव्हिड मिलर (नाबाद ३४) आणि डेव्हिड हसी (२०) यांनी सुरेख फटकेबाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2013 4:12 am

Web Title: punjab win with ease
टॅग Ipl
Next Stories
1 हिम्मतवाला..
2 घरच्या मैदानावर कोलकाताची मुंबईविरुद्ध आज कसोटी
3 वॉटसन शेर; हसी सव्वाशेर
Just Now!
X