पराभवाची मरगळ झटकून मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने अप्रतिम सांघिक खेळाचा नजराणा पेश करत आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत रविवारी पहिल्या विजयाची चव चाखली. २०९ धावांचा डोंगर उभारून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ७ बाद १९१ धावांवर रोखत मुंबईने १८ धावा राखून विजय नोंदवला.
 मुंबईने बंगळुरूच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. लेंडल सिमन्स आणि पार्थिव पटेल यांनी मुंबईला ४७ धावांची सलामी दिली. डेव्हिड विसीने पटेलला (१२) त्रिफळाचीत केले. सिमन्सने ४४ चेंडूंत ९ चौकार व दोन खणखणीत षटकार खेचून ५९ धावा केल्या. त्याला युजवेंद्र चहलने बाद केले. त्यानंतर ३७ चेंडूंत ८ चौकार व दोन षटकारांसह ५८ धावा करणाऱ्या उन्मुक्त चंदला चहलने बाद केले, परंतु रोहित शर्माने १५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार लगावून ४२ धावा केल्या. किरॉन पोलार्ड (५), अंबाती रायडू (०) आणि हरभजन सिंग (०) झटपट माघारी परतले. हार्दिक पंडय़ाने अखेरच्या षटकात १६ धावा चोपून मुंबईला २०९ धावांचा पल्ला गाठून दिला.
या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा सलामीवीर मनविंदर बिस्ला पाचव्या षटकात हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर माघारी परतला. नवव्या षटकात हरभजनने ख्रिस गेलचा त्रिफळा उडवून मुंबईला वर्चस्व मिळवून दिले. विराट कोहली (१८), दिनेश कार्तिक (१८) व रिली रोसोवू (०) हेही अपयशी ठरल्याने बंगळुरूसमोरील अडचणी आणखी वाढल्या. एबी डी’व्हिलियर्सने ११ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचून ४१ धावांची वादळी खेळी केली, परंतु बंगळुरूला विजय मिळवून देण्यात तोही अपयशी ठरला. १५व्या षटकात जसप्रित बुमराहने त्याला बाद केले. त्यानंतर डेव्हिड विसीने संघर्ष करत नाबाद ४७ धावा केल्या.  

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : ७ बाद २०९ (लेंडल सिमन्स ५९, उन्मुक्त चंद ५८, रोहित शर्मा ४२; डेव्हिड विसी ४/३३, युजवेंद्र चहल २/२८) विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ७ बाद १९१ (मनविंदर बिस्ला २०, एबी डी’व्हिलियर्स ४१, डेव्हिड विसी नाबाद ४७; हरभजन सिंग ३/२७)
सामनावीर : हरभजन सिंग
तोंडावर टेप लावून पोलार्डचा निषेध  
बंगळुरू : वेस्ट इंडिजचे खेळाडू मनमौजी असतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंचांनी ताकीद दिल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डने निषेध नोंदवत चक्क तोंडावर टेप चिकटवली. वेस्ट इंडिज संघाचा सहकारी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर ख्रिस गेल याच्यासोबत सामन्याच्या तिसऱ्याच षटकात पोलार्डची शाब्दिक चकमक झाली. या प्रकरणानंतर पंचांनी पोलार्डला ताकीद दिली.

Virat's Funny reaction Video Viral
MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
RR vs GT Match Updates Dhanshree Verma wished her husband Yuzvendra Chahal who played 150th IPL Match
RR vs GT : धनश्री वर्माने १५०वा आयपीएल सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलला दिल्या खास शुभेच्छा, VIDEO होतोय व्हायरल
Rohit Sharma Ishan Kishan Romario Shepherd Gerald Coetzee Tim David contributed to MI win
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका