News Flash

बाद फेरीची जागा पक्की करण्याचे बंगळुरूचे लक्ष्य

सनरायझर्स हैदराबादवर थरारक विजय साजरा करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ रविवारी दुबळ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय साजरा करून बाद फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने मदानात उतरणार आहे.

| May 17, 2015 05:25 am

सनरायझर्स हैदराबादवर थरारक विजय साजरा करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ रविवारी दुबळ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय साजरा करून बाद फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने मदानात उतरणार आहे. कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या बंगळुरूने विजयपथावर परतत बाद फेरीत प्रवेश करण्याचे आव्हान अद्याप जिवंत ठेवले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने १३ सामन्यांत १५ गुणांची कमाई केली असून ते चेन्नई सुपर किंग्ज पाठोपाठ (१६ गुण) दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे दिल्लीच्या खात्यात १३ सामन्यांत केवळ १० गुण आहेत आणि रविवारच्या लढतीत स्वाभिमानासाठी ते मदानात उतरतील. विराट कोहली, ए. बी. डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे बंगळुरूचे प्रमुख अस्त्र आहेत. गोलंदाजीत मिचल स्टार्क हा आपली कामगिरी चोख बजावत आहे. याउलट दिल्लीला युवराज सिंग, श्रेयस अय्यर, जे.पी. डय़ुमिनी आणि क्विंटन डी कॉक हे फलंदाज असूनही चांगली कामगिरी करण्यात अपयश आले.
 
सामन्याची वेळ : साय. ४ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण: सोनी मॅक्स, सोनी सिक्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 5:25 am

Web Title: rcb vs srh
टॅग : Ipl,Ipl 8
Next Stories
1 रंगतदार लढतीत बँगलोरचा ‘लगान’ विजय
2 औरंगाबादेत आयपीएल सट्टेबाज जेरबंद
3 संयुक्त अरब अमिरातीत मिनी आयपीएल रंगणार
Just Now!
X