News Flash

सचिन आणि पॉन्टिंग रमले सरावात

सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग हे एका युगातील दोन महान खेळाडू यापूर्वी एकमेकांसमोर मैदानात ठाकलेले सर्वानीच पाहिले आहे, पण आयपीएलच्या निमित्ताने या दोन्ही खेळाडूंना चाहत्यांनी

| April 2, 2013 03:16 am

सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग हे एका युगातील दोन महान खेळाडू यापूर्वी एकमेकांसमोर मैदानात ठाकलेले सर्वानीच पाहिले आहे, पण आयपीएलच्या निमित्ताने या दोन्ही खेळाडूंना चाहत्यांनी पहिल्यांदाच एकत्र सराव करताना पाहिले. आयपीएलमधल्या पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे.
सचिनने यावेळी नेट्समध्ये फलंदाजीचा भरपूर सराव केला, तर संघाचा कर्णधार पॉन्टिंग, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी ४५ मिनिटे फलंदाजीचा सराव केला. यावेळी सचिनचा सराव पॉन्टिंग जवळून पाहत होता. यावेळी संघाचे मुख्य मार्गदर्शक अनिंल कुंबळे यांच्याबरोबर या दोघांनी चर्चाही केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2013 3:16 am

Web Title: sachin and ponting done the practice for ipl
Next Stories
1 डोनाल्ड यांचे मार्गदर्शन ही सुवर्णसंधी – अभिषेक
2 राजकारणामुळे खेळभावना कमी होणार नाही -संगकारा
3 आयपीएलला मुकल्यामुळे रायडर निराश
Just Now!
X