29 September 2020

News Flash

जॉन्सन आणि अक्षर आमच्या विजयाचे शिल्पकार – सेहवाग

किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करत साऱ्यांनाच धक्का दिला. पंजाबचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने या विजयाचे श्रेय मिचेल जॉन्सन आणि अक्षर पटेल यांना

| April 23, 2015 04:05 am

किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करत साऱ्यांनाच धक्का दिला. पंजाबचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने या विजयाचे श्रेय मिचेल जॉन्सन आणि अक्षर पटेल यांना दिले आहे. बिनीचे फलंदाज बाद झाल्यावरही या दोघांनी संघाला बरोबरी करून दिली, तर जॉन्सनने सुपर ओव्हरमध्ये चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
‘‘आमच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. जॉन्सनने अप्रतिम गोलंदाजी केली, त्याचबरोबर जॉन्सन आणि अक्षर या दोघांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजयपथावर नेण्यात मोलाची भूमिका बजावली,’’ असे सेहवाग म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 4:05 am

Web Title: sehwag credits mitchell johnson axar patel for win vs rajasthan royals
Next Stories
1 योग्य समन्वय हेच यशाचे गमक – धोनी
2 सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय
3 चेन्नईला विजयाची आस
Just Now!
X