29 May 2020

News Flash

औरंगाबादेत आयपीएल सट्टेबाज जेरबंद

आयपीएल २०-२० क्रिकेट स्पर्धेसाठी सट्टेबाजी करणाऱ्या ५ उच्चभ्रू व्यापारी व मुख्य सट्टेबाजास औरंगाबाद गुन्हे शाखेने अटक केली.

| May 16, 2015 06:43 am

आयपीएल २०-२० क्रिकेट स्पर्धेसाठी सट्टेबाजी करणाऱ्या ५ उच्चभ्रू व्यापारी व मुख्य सट्टेबाजास औरंगाबाद गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीकडून १९० हँडसेट, ६ लाख ४ हजार ८९० रुपये व ४ महागडय़ा चारचाकी गाडय़ा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. नरेश धर्माजी पोतलवाड (वय ३५) या आरोपीच्या घरातून सट्टेबाजीसाठी केल्या जाणाऱ्या मोबाइल कनेक्शनचे जाळेच पोलिसांना आढळले. मराठवाडय़ातील प्रमुख शहरांसह दिल्लीपर्यंत सट्टेबाजांची साखळी असून, यात एखादा क्रिकेट खेळाडूही सामील आहे का, याचा तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2015 6:43 am

Web Title: six held for betting on ipl match from aurangabad
टॅग Aurangabad,Ipl
Next Stories
1 संयुक्त अरब अमिरातीत मिनी आयपीएल रंगणार
2 कोलकाता-राजस्थानची ‘प्ले-ऑफ’साठी लढत
3 चेन्नईपुढे पंजाबचे आव्हान
Just Now!
X