04 December 2020

News Flash

कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच यशाची गुरुकिल्ली – सचिन तेंडुलकर

कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच मुंबई इंडियन्सच्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत संघाचा मार्गदर्शक आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

| May 25, 2015 02:23 am

कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच मुंबई इंडियन्सच्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत संघाचा मार्गदर्शक आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
संघासोबतचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. आम्ही एकजुटीने उभे राहिलो आणि आव्हानांना समोरे गेलो. संघातील प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतली आणि योजना अंमलात आणल्या. यातच मुंबईच्या यशाचे गमक असल्याचे सचिन म्हणाला. रोहित आणि सिमन्सने संघाला चांगली सुरूवात करून दिल्याचा फायदा झाल्यानेच भक्कम आव्हान उभारता आल्याचे सचिन एका मुलाखतीत म्हणाला. आयपीएलमध्ये कमबॅक करण्याची शक्यता यावेळी सचिनने फेटाळून लावली मात्र, काही संकल्पना पुढे आल्या आहेत. त्यावर विचार सुरू असल्याचे सांगत सचिनने फिरकीपटू शेन वॉर्नसोबत माजी खेळाडूंच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लीगचे आयोजनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2015 2:23 am

Web Title: staying together in tough times is the key to mi success sachin tendulkar
टॅग Mi,Sachin Tendulkar
Next Stories
1 मुंबई इंडियन्सची विजेतेपदाला गवसणी!
2 …म्हणून मुंबई इंडियन्सने बाजी मारली
3 आज महामुकाबला
Just Now!
X