शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसनच्या १७६ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या आधारे सनरायजर्स हैदराबादने दिल्ली डेअर डेव्हिल्सवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स यांचा सामना रंगला. गोलंदाजी हा हैदराबादच्या संघाचा प्लस पॉईंट आहे. मात्र ही गोलंदाजी फोडून काढत दिल्लीच्या खेळाडूंनी २० षटकांमध्ये १८७ धावा केल्या. ऋषभ पंतने हा खेळाडू आज दिल्लीसाठी जबरदस्त खेळी करणारा ठरला. ऋषभ पंतने ६३ चेंडूत ७ षटकार आणि १५ चौकार मारत नाबाद १२८ धावा केल्या. या धावाच दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.

दिल्लीने दिलेले १८८ धावांचे आव्हान हैदराबादने १८.५ षटकांत पूर्ण केले.  हैदराबादची सलामीची जोडी अवघ्या १५ धावांवर फोडण्यात दिल्लीच्या गोलंदाजांना यश आले. पण त्यानंतर शिखर धवन आणि केन विल्यमसनने विक्रमी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादकडून धवनने ५० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९२ धावा केल्या तर, विल्यम्सनने नाबाद ८३ धावांचे योगदान दिले. या दोघांनी १७६ धावांची भागीदारी रचली.

अपडेट्स

हैदराबादचा दिल्लीवर ९ गडी राखून दणदणीत विजय

शिखर धवनची नाबाद ९२ तर विल्यमसनची नाबाद ८३ धावांची खेळी

शिखर धवन आणि विल्यमसनमुळे हैदराबाद विजयाच्या उंबरठ्यावर

कर्णधार केन विल्यमसनची कर्णधारपदाला साजेशी खेळी

शिखर धवनचे अर्धशतक पूर्ण

हैदराबाद सनरायजर्सला पहिला झटका

हैदराबादची सावध सुरुवात

हैदराबाद सनरायजर्सचा डाव सुरु

ऋषभ पंतचे शतक पूर्ण

ऋषभ पंतचे अर्धशतक पूर्ण

दिल्लीला चौथा झटका, हर्षल पटेल धावचीत

दिल्लीला तिसरा झटका, श्रेयस अय्यर आऊट

दिल्लीला लागोपाठ दोन झटके, दोन फलंदाज तंबूत

दिल्लीने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली