IPL 2018 – मुंबई इंडियन्सच्या अडचणींमध्ये वाढ, महत्वाचा गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर

पाठीची दुखापत बळावल्यामुळे संघातून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

पॅट कमिन्स (संग्रहीत छायाचित्र)

आयपीएलच्या अकराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या संघातील ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. अकराव्या पर्वाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्जकडून पराभवाचा सामना कराला लागला होता. पॅट कमिन्सच्या दुखापतीबद्दलच्या वृत्ताला क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डानेही दुजोरा दिला आहे.

अवश्य वाचा – IPL 2018 – चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का, दुखापतीमुळे केदार जाधव स्पर्धेबाहेर

कमिन्सची दुखापत आणखी बळावू नये याकारणासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या कारणामुळे कमिन्स आयपीएलचा संपूर्ण हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळू शकणार नाहीये. मुंबईने अकराव्या हंगामासाठी कमिन्सवर ५.४ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं होतं. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे कमिन्सला ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंडविरुद्ध वन-डे आणि झिम्बाब्वे-पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया या तिरंगी टी-२० मालिकेत खेळता येणार नाहीये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2018 pat cummins ruled out of ipl due to back injury big blow to mumbai indians