VIDEO: पहिल्या प्रेमाचा उल्लेख करताना धोनी मध्येच थांबला…म्हणाला बायकोला काहीही सांगू नका

सहसा आपल्या खासगी आयुष्याविषयी फारसं व्यक्त न होणारा धोनी या कार्यक्रमात मात्र अगदी दिलखुलास गप्पा मारताना दिसला.

SAKSHI DHONI
महेंद्रसिंह धोनी, साक्षी

संघ एखादा अटितटीचा सामना जिंकूदेत किंवा एखाद्या खेळाडूकडून मैदानावर काही चूक होऊदेत. महेंद्रसिंह धोनी कधीच आपल्यावर असणारा ताबा सोडून वागलेला नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळतेवेळीसुद्धा धोनीच्या या वृत्तीने अमनेकांची मनं जिंकली. असा हा ‘कॅप्टन कूल’ सध्या आयपीएलच्या ११ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. याच संघाशी संलग्न असणाऱ्या धोनीने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात धोनीने चक्क त्याच्या खासगी आयुष्याविषयी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला.

सहसा आपल्या खासगी आयुष्याविषयी फारसं व्यक्त न होणारा धोनी ‘गल्फ ऑईल’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अगदी दिलखुलास गप्पा मारताना दिसला. याच कार्यक्रमात त्याला एका अनपेक्षित प्रश्नाचा सामनाही करावा लागला. आयुष्यातील सर्वात पहिलं क्रश कोण म्हणजे पहिलं प्रेम कोण, असा प्रश्न यावेळी धोनीला विचारण्यात आला. मुख्य म्हणजे कार्यक्रमाची धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीनेच धोनीच्या क्रश म्हणून काही मुलींची नावं घेण्यास सुरुवात केली. ज्यात त्याने ‘स्वाती’ या नावाचाही उल्लेख केला. काही वेळ धोनीनेही त्याची फिरकी घेतली आणि नंतर स्वाती हे नाव अगदी बरोबर असल्याचं सांगितलं.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

१९९९ मध्ये इयत्ता बारावीत असतेवेळी आपण स्वातीला शेवटचं पाहिलं होतं, असंही त्याने या कार्यक्रमात सांगितलं. धोनीने त्याच्या खासगी आयुष्याविषयी केलेल्या या गौप्यस्फोटाबद्दल त्याच्या पत्नीला म्हणजेच साक्षीला काही कळू देऊ नका, अशी विनंतीही त्याने सर्वांना केली. अर्थात त्याच्या या वक्तव्यात मिश्किल अंदाज होता. मुख्य म्हणजे ‘कॅप्टन कूल’ने केलेलं हे विधानच इतकं लक्षवेधी होतं की माध्यमांपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी त्याच्या क्रशच्या चर्चा पाहायला मिळाल्या. त्यामुळे साक्षीपर्यंत माहिच्या क्रशची ही चर्चा न पोहोचणं तसं कठिणच आहे, असंच म्हणावं लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2018 watch video ms dhoni as csk captains first crush is revealed magically

ताज्या बातम्या