जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं ‘रनसंग्राम’ होणार आहे.

कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर १० नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या वेळापत्राकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबुधाबी आणि १२ सामने शारजामध्ये होणार आहेत. बीसीसीआयने साखळी सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक नंतर जाहीर कऱण्यात येणार आहे.

आणखी वाचा : 

एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएल २०२० चं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2020 : जाणून घ्या चेन्नई सुपरकिंग्जचं वेळापत्रक…

IPL २०२०: असे आहेत मुंबई इंडियन्स संघाचे सामने

IPL 2020 : अशी आहे मुंबईची पलटण, पाहा कोणकोण आहे संघात 

पुन्हा एकदा चेन्नईच ‘सुपर किंग्ज’?; असा आहे माहीचा संघ