IPL 2020 : CSK च्या रंगात रंगलंय त्याचं घर, पाहा कसं आहे धोनीच्या चाहत्याचं खास घर

संघाची कामगिरी खराब, तरीही चाहत्यांचं CSK वर प्रेम कायम

आयपीएलचं युद्ध जसं ८ संघांमध्ये मैदानात लढलं जातं तसंच ते मैदानाबाहेर चाहत्यांमध्येही लढलं जातं. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अशा संघाचे चाहते सोशल मीडियावर आपल्या सामन्यादरम्यान जोशात असतात. त्यातच महेंद्रसिंह धोनीमुळे देशभरातच चेन्नईचे चाहते निर्माण झाले आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा हा संघ यंदाच्या हंगामात गुणतालिकेत खाली फेकला गेला आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर धोनीचे चाहते तो फलंदाजीसाठी उशीरा येतो म्हणून नाराज होते.

परंतू आपल्या संघावर आणि खेळाडूवर निस्सिम प्रेम करणाऱ्या चाहत्यांची गोष्टचं काही वेगळी असते. तामिळनाडूच्या अरंगुर येथील गोपी क्रिश्नन आणि त्याचा परिवार चेन्नई सुपरकिंग्जवरील आपल्या खास प्रेमासाठी ओळखला जातो. गोपी क्रिश्नन आणि त्याचा परिवार हा चेन्नईच्या संघाचा जबरा फॅन आहे. याचसाठी त्याने आपलं घरंही चेन्नई सुपरकिंग्जची ओळख असलेल्या पिवळ्या रंगात रंगवून घेतलं आहे. तसंच त्याने आपल्या घराला Home of Dhoni Fan असं नावं दिलंय. पाहा चेन्नईच्या या खास चाहत्याच्या घराचे फोटो…

सुरेश रैना-हरभजन सिंह या महत्वाच्या खेळाडूंची अनुपस्थितीत यंदा संघाला चांगलीच जाणवत आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करत चेन्नईने यंदाच्या हंगामाची चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर प्रमुख खेळाडूंची दुखापत आणि हरवलेला फॉर्म यामुळे CSK चा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2020 die heart csk fan from tamil nadu paint his house in csk color watch photos psd

Next Story
IPL 2020: प्रेक्षक नसल्याचा क्रिकेटच्या दर्जावर परिणाम होईल? लक्ष्मण म्हणतो…
ताज्या बातम्या