IPL 2020 : व्वा, काय 3D परफॉर्मन्स आहे ! विजय शंकर सोशल मीडियावर ट्रोल

महत्वाच्या क्षणी विजय शंकर शून्यावर बाद

फोटो सौजन्य – Saikat Das / Sportzpics for BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अखेरच्या क्षणी फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीचा फटका हैदराबादला बसला. जॉनी बेअरस्टो आणि मनिष पांडे यांच्या फटकेबाजीमुळे एका क्षणाला सामना हैदराबाद सहज जिंकले असं वाटत असतानाच चहलने एकाच षटकात दोन बळी घेत सामन्याचं पारडं बंगळुरुच्या बाजूने फिरवलं. चहलने बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडलं.

मात्र भोपळाही न फोडता माघारी परतलेला विजय शंकर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. २०१९ विश्वचषकासाठी अंबाती रायुडूला डावलून विजय शंकरला संधी देण्यात आली होती. तत्कालीन निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी विजय शंकरचा 3D परफॉर्मन्समुळे त्याला स्थान देण्यात आल्याचं सांगितलं होतं. हाच धागा पकडून नेटकऱ्यांनी विजयला ट्रोल केलंय.

पहिल्याच सामन्यात विजय शंकर अपयशी झालेला असताना रायुडूने पहिल्याच सामन्यात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. मुंबईविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करुन त्याने चेन्नईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2020 fans troll vijay shankar for getting out on 0 psd

ताज्या बातम्या