Video : धोनीने मारलेला बॉल थेट मैदानाबाहेर, रस्त्यावरील व्यक्तीला मिळाला बॉल

अखेरच्या षटकात धोनीने मारले ३ षटकार

फोटो सौजन्य – Hotstar

राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला पराभवाचा सामना सामना करावा लागला. २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ २० षटकांत २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणं पसंत केल्यामुळे सोशल मीडियावर चाहते त्याच्याविरोधात नाराज असल्याचं दिसून आलं. अखेरच्या षटकांत धोनीने ३ षटकार खेचत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

अखेरच्या षटकात धोनीने ३ षटकार मारले ज्यातील एक षटकार हा थेट मैदानाबाहेर गेला. रस्त्यावरुन जात असलेल्या एका व्यक्तीला हा बॉल मिळाला…त्यानेही हा बॉल घेऊन आनंदाने घरी जाणं पसंत केलं. पाहा हे व्हिडीओ…

चेन्नईकडून फाफ डु-प्लेसिसने अर्धशतक झळकावत राजस्थानला चांगली झुंज दिली. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2020 ms dhoni hits out of the park a lucky man takes the ball home psd