IPL २०२०: असे आहेत मुंबई इंडियन्स संघाचे सामने

मुंबई आणि चेन्नईमध्ये पहिला सामना

मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर १० नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. पाहूयात मुंबईचे साखळी सामन्यातील वेळापत्रकाबद्दल……..

शनिवार, १९ सप्टेंबर      चेन्नई विरुद्ध मुंबई                 सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

बुधवार, २३ सप्टेंबर      कोलकाता विरुद्ध मुंबई          सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

सोमवार, २८ सप्टेंबर     बंगळुरु विरुद्ध मुंबई              सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

गुरुवार, १ ऑक्टोबर     पंजाब विरुद्ध मुंबई               सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

रविवार, ४ ऑक्टोबर     मुंबई विरुद्ध हैदराबाद          दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी

बुधवार, ६ ऑक्टोबर     मुंबई विरुद्ध राजस्थान          सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

रविवार, ११ ऑक्टोबर   मुंबई विरुद्ध दिल्ली               सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

शुक्रवार, १६ ऑक्टोबर   मुंबई विरुद्ध कोलकाता     सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

रविवार,  १८ ऑक्टोबर  मुंबई विरुद्ध पंजाब            सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

शुक्रवार, २३ ऑक्टोबर   चेन्नई विरुद्ध मुंबई           सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

रविवार, २५ ऑक्टोबर   राजस्थान विरुद्ध मुंबई     सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

बुधवार, २८ ऑक्टोबर    मुंबई विरुद्ध बंगळुरु       सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

शनिवारी, ३१ ऑक्टोबर   दिल्ली विरुद्ध मुंबई          सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

बुधवार, ३ नोव्हेंबर         हैदराबाद विरुद्ध मुंबई     सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

 

IPL 2020 : अशी आहे मुंबईची पलटण, पाहा कोणकोण आहे संघात

फलंदाज – रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे (विकेटकिपर), अनमोलप्रीत सिंग, ख्रीस लीन, इशान किशन (विकेटकिपर), मोहसीन खान, क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, शेर्फन रुदरफोर्ड

गोलंदाज – जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, जेम्स पैटिनसन, दिगविजय देशमुख, जयंत यादव, मिचेल मॅक्लेनघन, नॅथन कुल्टर नाइल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट

अष्टपैलू – हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्रृणाल पांड्या, अनुकुल रॉय, प्रिन्स बलंवत राय

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl schedule 2020 mumbai indians ipl 2020 schedule nck