News Flash

कोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष

कोलकाताची मदार प्रामुख्याने रसेल, नरिन आणि राणा यांच्यावर आहे.

| April 21, 2018 05:06 am

ख्रिस गेल व आंद्रे रसेल

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गुणतालिकेत कोलकाता नाइट रायडर्स अग्रस्थानावर असून, शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या त्यांच्या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या लढतीमध्ये कोलकाताचा आंद्रे रसेल आणि सुनील नरिन तसेच पंजाबचा ख्रिस गेल या वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज क्रिकेटपटूंमधील द्वंद्व पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गुरुवारी गेलने यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिले शतक नोंदवले. त्याने सनरायजर्स हैदराबादसारख्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर ६३ चेंडूंत नाबाद १०४ धावांची दिमाखदार खेळी साकारत टीकाकारांना चोख उत्तर दिले. गेलने आपल्या खेळीत ११ षटकार खेचले. यापैकी चार षटकार त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम गोलंदाज रशिद खानला मारले. गेलला दोन सामन्यांत संघात स्थान मिळाले नव्हते, मात्र जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने दोन सामना जिंकून देणाऱ्या खेळी साकारल्या. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने ६३ धावा केल्या होत्या.

ईडन गार्डन्सवर गेलला वेसण घालण्यासाठी त्याचा सहकारी सुनील नरिन याशिवाय कुलदीप यादव, अनुभवी पियुष चावला आणि कामचलाऊ नितीश राणा उत्सुक असतील. पंजाबकडे लोकेश राहुल, मयांक अगरवाल, करुण नायर, आरोन फिन्च आणि युवराज सिंग यांच्यासारखे फलंदाज आहेत. कोलकाताची मदार प्रामुख्याने रसेल, नरिन आणि राणा यांच्यावर आहे.

’  सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:54 am

Web Title: all eyes on west indies batsman in kolkata knight riders and king xi punjab match
Next Stories
1 अवघ्या ५१ चेंडूत शतकाला गवसणी घालणाऱ्या शेन वॅटसनचा ‘या’ क्लबमध्ये झाला समावेश
2 IPL 2018 : चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक
3 IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ६४ धावांनी विजय
Just Now!
X