22 February 2020

News Flash

यंदाचं आयपीएल गाजवणाऱ्या या खेळाडूबद्दल ब्रेट लीने केली भविष्यवाणी

वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने सध्याचे आयपीएल गाजवणाऱ्या एका वेगवान गोलंदाजाला भारतीय गोलंदाजीचं भविष्य म्हटलं आहे.

ब्रेट ली

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने एक भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी सध्याचे आयपीएल गाजवणाऱ्या एका वेगवान गोलंदाजाबद्दल आहे. ब्रेट ली ने त्या वेगवान गोलंदाजाला भारतीय गोलंदाजीचं भविष्य असल्याचं म्हटलं आहे.

ब्रेट ली म्हणाला आहे की आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज शिवम मावी हा भारतीय गोलंदाजीचे भविष्य आहे. शिवम हा गोलंदाज म्हणून उत्तम आहे. एका चांगल्या गोलंदाजाकडे असावेत ते सर्व गुण त्याच्याकडे आहेत. त्याची गोलंदाजीची अॅक्शन सुंदर आहे. एका परिपक्व आणि परिपूर्ण गोलंदाजाप्रमाणे तो गोलंदाजी करतो.

वेगवान युवा गोलंदाजांमध्ये आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती असणे गरजेचे असते. तशी खिलाडूवृत्ती त्याच्यात आहे. गोलंदाजी करताना त्या परिस्थितीत नक्की कशा प्रकारची गोलंदाजी करावी, हे त्याला कळते. आणि म्हणूनच तो त्याच्या गोलंदाजीचा आनंद घेऊन खेळतो, असेही ब्रेट ली म्हणाला.

शिवम मावीने सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या हंगामात ७ सामन्यांमध्ये ३ बळी टिपले आहेत.

First Published on May 5, 2018 7:35 pm

Web Title: brett lee calls shivam mavi the future of indian bowling
Next Stories
1 IPL 2018, CSK vs RCB : चेन्नईची बंगळूरूवर ६ गडी राखून मात
2 … म्हणून कृणाल पांड्याने केली वादळी खेळी
3 रोहित शर्मा T20 क्रिकेटमधला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’
X