05 August 2020

News Flash

IPL 2018 – चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार ‘या’ विक्रमाची नोंद

शेन वॉटसनने शतकी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. मात्र याच सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यानेही एक विक्रम केला.

चेन्नई आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. या सामन्यात शेन वॉटसनने शतकी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. मात्र याच सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यानेही एक विक्रम प्रस्थापित केला.

हैदराबाद संघाची फलंदाजी सुरु असताना करण शर्माच्या गोलंदाजीवर केन विल्यमसन यष्टीचित झाला. फटकेबाजी करण्याच्या नादात लेगस्पिनच्या जाळ्यात तो सर्पसेहल गुरफटला. धोनीने त्याला क्षणाचाही विलंब न करता यष्टीचित केले आणि तंबूचा रस्ता दाखवला. हे यष्टिचित धोनीचे आयपीएलमधील ३३ वे यष्टीचीत ठरले. हे यष्टिचित करून धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक यष्टिचित करण्याचा मान मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला.

या यष्टिचितमुले धोनीने कोलकाताच्या रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडीत काढला. उथप्पाने आयपीएलमध्ये विविध संघाकडून यष्टिरक्षण करताना एकूण सर्वाधिक ३२ यष्टिचित केले होते. हा विक्रम आजच्या सामन्यात धोनीने मोडला.

विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येही यष्टीचित करण्यात धोनीचेच वर्चस्व आहे. आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये एकूण २९३ गडी यष्टिचित झाले आहेत. त्यापैकी ७३ गडी हे धोनीने यष्टिचित केलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2018 10:56 pm

Web Title: dhoni breaks uthappas stumpings record in ipl
टॅग Dhoni,Ipl,T20
Next Stories
1 IPL 2018 – छापा की काटा? नेमकी नाणेफेक कोणी जिंकली? हा अभुतपूर्व गोंधळ एकदा पाहाच…
2 IPL 2018 – ‘कॅप्टन केन’ची फलंदाजीत चमक, अनोखा विक्रम केला आपल्या नावावर
3 IPL 2018 – दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग … काय आहे योगायोग?
Just Now!
X