02 July 2020

News Flash

IPL 2018 – इडन गार्डन्स ठरलं आयपीएलच्या अकराव्या हंगामातलं सर्वोत्कृष्ट मैदान

सौरव गांगुलीची ट्विटरवरुन माहिती

मैदानातील सर्व कर्मचाऱ्यांचे गांगुलीने आभार मानले आहेत

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत पोहचू शकला नाही. मात्र कोलकात्याचं घरचं मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इडन गार्डन्सच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अकराव्या हंगामातील सर्वोत्कृष्ट मैदान हा किताब इडन गार्डन्स मैदानाला मिळालेला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली आहे.

अकराव्या हंगामातील २ एलिमिनेटर सामने पुण्यातील गहुंजे मैदानावरुन कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात हलवण्यात आले होते. यावेळी बंगाल क्रिकेट असोसिएशनने इडन गार्डन्स मैदानावर यशस्वीपणे दोन्ही सामन्यांचं आयोजन केलं होतं. त्यामुळे गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये मैदानातील सर्व कर्माचाऱ्यांचे आभार मानले आहेत. दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात कोलकात्याच्या संघाला हैदराबादकडून पराभव स्विकारावा लागल्यामुळे त्यांचा आयपीएलमधला प्रवास संपुष्टात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2018 5:10 pm

Web Title: eden gardens named best venue and ground of ipl 2018
Next Stories
1 IPL 2018 – अंतिम फेरीत पोहचूनही धोनीला ‘या’ गोष्टीची खंत कायम
2 IPL 2018 – जेव्हा संतापलेल्या दिनेश कार्तिकच्या तोंडून अपशब्द निघतात…
3 दाक्षिणात्य भाऊबंदकी!
Just Now!
X