18 February 2020

News Flash

IPL 2018 – या ४ खेळाडूंचं मुंबई इंडियन्समधलं भवितव्य धोक्यात??

मुंबई प्ले-ऑफच्या शर्यतीमधून बाहेर

मुंबईचं आव्हान साखळी फेरीमध्येच संपुष्टात

२०१७ साली आयपीएलच्या हंगामात अंतिम फेरीत पुण्याच्या संघावर एका धावेने मात करुन विजेतेपद पटकावलं. मात्र अकराव्या हंगामात मुंबईचा संघ प्ले-ऑफमध्ये जागा मिळवू शकला नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवणं आवश्यक होतं. मात्र फलंदाजांनी केलेल्या निराशेमुळे मुंबईला साखळी फेरीतून माघार घ्यावी लागली.

अवश्य वाचा – आयपीएलची मोहर- गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर यंदाच्या हंगामात अशी वेळ का आली?

यंदाच्या हंगामात लिलावादरम्यान अनेक खेळाडूंवर मुंबईने कोट्यवधी रुपयांची बोली लावली, मात्र यातील बहुतांश खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे आगामी आयपीएलच्या हंगामात काही महत्वाच्या खेळाडूंना संघात जागा देताना मुंबई इंडियन्सचा संघ १० वेळा विचार करण्याची शक्यता आहे.

१) जे.पी.ड्युमिनी –

अकराव्या हंगामासाठीच्या लिलावात मुंबईने ड्युमिनीसाठी १ कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र मुंबईकडून ६ सामन्यांमध्ये खेळताना ड्युमिनी फक्त ३६ धावा करु शकला. या हंगामात ड्युमिनीला पोलार्डच्या तुलनेत कमी संधी मिळाल्या ही गोष्ट मान्य केली तरीही ज्या संधी मिळाल्या त्याचं सोनं करणं ड्युमिनीला जमलं नाही. त्यामुळे पुढच्या हंगामात मुंबई ड्युमिनीबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे.

२) मुस्तफिजूर रेहमान –

सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये मुस्तफिजूर रेहमानने चांगली सुरुवात केली. अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत मुस्तफिजूर रेहमानने आपली प्रतिभा सिद्ध केली होती. मात्र नंतरच्या सामन्यांमध्ये मुस्तफिजुरची कामगिरी खालावत गेली. ७ सामन्यांमध्ये मुस्तफिजुरला केवळ ७ बळी मिळवता आले. प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुस्तफिजुरला संधी देण्यात आली होती. मात्र या सामन्यातही त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पुढच्या हंगामासाठी मुस्तफिजुरला मुंबईच्या संघात प्रवेश मिळेल याची शाश्वती कमीच आहे.

३. मिचेल मॅक्लेनघन –

दुखापतग्रस्त जेसन बेहरनडॉर्फच्या जागी मिचेल मॅक्लेनघनला मुंबईच्या संघात जागा मिळाली होती. या संधीचा पुरेपूर फायदा उचलत मॅक्लेनघनने ११ सामन्यांमध्ये १४ बळी घेतले. मात्र मॅक्लेनघन हा मुंबईची पहिली पसंती नाही, हे अकराव्या हंगामाच्या लिलावादरम्यान स्पष्ट झालं होतं. त्यामुळे पुढील हंगामासाठी हा खेळाडू मुंबईच्या संघात स्थान मिळवू शकेल याची खात्री देता येत नाही.

४. कायरन पोलार्ड –

अकराव्या हंगामाच्या लिलावात मुंबईने राईट टू मॅच कार्डाचा वापर करत पोलार्डला आपल्या संघात कायम राखलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला पोलार्ड हा मुंबईसाठी यंदाच्या हंगामात तितकीच बहारदार कामगिरी करेल का यावर क्रीडा समिक्षकांमध्ये दुमत होतं. प्रत्यक्ष सामन्यांमध्येही पोलार्डला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ९ सामन्यांमध्ये पोलार्डने १३३ धावा केल्या. त्यामुळे पुढच्या हंगामात मुंबईच्या संघात पोलार्डला जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

First Published on May 21, 2018 5:58 pm

Web Title: ipl 2018 4 players who might be dropped by mumbai indians in ipl 2019
टॅग IPL 2018,Mi
Next Stories
1 सुपरफ्लॉप परफॉर्मन्समुळे ‘त्या’ खेळाडूवर लावलेले फ्रेंचायजीचे कोटयावधी रुपये बुडाले
2 IPL 2018 – धोनीसाठी सुरेश रैनानं केला मोठा त्याग, प्रेक्षकांकडून कौतुक
3 IPL 2018 – ….म्हणून बॉलिवूडचा किंग खान ती रात्र झोपलाच नाही
Just Now!
X