03 April 2020

News Flash

IPL 2018 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सामना गमावला, मात्र मॅक्युलमच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा मॅक्यूलम दुसरा फलंदाज

सुनील नरीनची फटकेबाजी आणि नितीश राणा-दिनेश कार्तिक यांच्यातल्या भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आपल्या पहिल्याच सामन्यात पराभव केला. मात्र बंगळुरुचा धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमने कालच्या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पार करणारा मॅक्युलम हा दुसरा फलंदाज ठरला आहे. मॅक्युलम व्यतिरीक्त वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सध्य़ा ख्रिस गेलच्या खात्यात ११ हजार ६८ धावा जमा आहेत.

९ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मॅक्युलमला अवघ्या ८ धावांची गरज होती. कोलकात्याच्या विनय कुमारच्या गोलंदाजीवर पहिल्याच डावातील चौथ्या चेंडूवर षटकार खेचत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पहिल्या सामन्यात मॅक्युलमने २७ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात तो अयशस्वी ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2018 10:39 am

Web Title: ipl 2018 brendon mccullum completes 9000 runs in t20 cricket
Next Stories
1 IPL 2018 : राहुलच्या विक्रमी अर्धशतकामुळे पंजाबचा दिल्लीवर ६ गडी राखून विजय
2 या ५ कारणांमुळे पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत
3 डीजे.. ब्राव्हो.. डीजे… ब्राव्हो….
Just Now!
X