आयपीएलच्या ११ व्या मोसमातील पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ एकमेकांमध्ये भिडले. कोलकाता नाइट रायडर्सने २०२ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नव्हते. मात्र ब्राव्हो आणि सॅम बिलियन्स या दोघांच्याही आक्रमक खेळीमुळे चेन्नई सुपरकिंग्जने एवढे मोठे आव्हानही पार केले. पाच गडी राखून चेन्नईने केकेआरवर विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॉलिंग आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण या दोन्हीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येत रोखायचे ही कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीची स्ट्रॅटेजी आहे. मात्र ही स्ट्रॅटेजी फेल गेल्याचे दिसून आले. कारण आंद्रे रसेलच्या झुंजार खेळीने कोलकाता नाइट रायडर्सने २०२ धावांचा डोंगर उभा केला. ११ षटकार, १ चौकार यांसह ३६ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी करत आंद्रे रसेलने केकेआरच्या २०२ धावांमध्ये भर घातली.

८० धावांवर तिसरी, ८१ धावांवर चौथी आणि ८९ धावांवर पाचवी विकेट गेल्यावर केकेआर १५० पेक्षा जास्त धावा करेल असे वाटले नव्हते. मात्र एवढा मोठा स्कोअर उभा राहिला तो आंद्रेच्या धडाकेबाज खेळामुळेच. हे आव्हान पार करताना चेन्नईच्या संघाची चांगलीच दमछाक झाली. मात्र शेवटच्या पाच षटकांमध्ये सॅम बिलियन्स आणि ब्राव्हो या दोघांनी केलेली खेळी चेन्नईसाठी महत्त्वाची ठरली आणि चेन्नईचा विजय सहज सोपा झाला.

हा सामना चेन्नई येथील एम चिदंबमरम स्टेडियमवर होतो आहे. अशात या सामन्याला कावेरी पाणी वाटपाच्या वादाचीही किनार लाभली आहे. कावेरीच्या मुद्द्यावरून तामिळ संघटनांनी मैदानात साप सोडण्याचा इशारा दिला. इतकेच नाही तर मैदानाबाहेरही आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. त्यामुळे मैदानाबाहेर सुमारे ४ ते ५ हजार पोलिसांचा फौजफाटाही तैनात होता.

लाइव्ह अपडेट्स

चेन्नईला पाचवा धक्का, सॅम बिलियन्स झेलबाद

चेन्नईला चौथा धक्का, महेंद्रसिंग धोनी झेलबाद

चेन्नईला तिसरा धक्का, सुरेश रैना झेलबाद

चेन्नईला दुसरा धक्का, अंबाती रायडू झेलबाद

चेन्नईला पहिला धक्का, शेन वॉटसन झेलबाद

शेन वॉटसन आणि अंबाती रायडू मैदानावर

चेन्नई सुपरकिंग्जच्या फलंदाजीला सुरुवात

कोलकाताने चेन्नईपुढे ठेवले २०३ धावांचे आव्हान

कोलकाता नाइट रायडर्सला सहावा झटका, दिनेश कार्तिक पायचीत

कोलकाता नाइट रायडर्सला पाचवा झटका, रिंकू सिंग आऊट

कोलकाता नाइट रायडर्सला चौथा झटका, रॉबिन उथप्पा रनआऊट

कोलकाता नाइट रायडर्सला तिसरा झटका, नितेश राणा झेलबाद

कोलकाता नाइट रायडर्सला दुसरा झटका, ख्रिस लिन आऊट

कोलकाता नाइट रायडर्सला पहिला झटका, सुनील नारायण झेलबाद

कोलकाता नाइट रायडर्सची आक्रमक सुरुवात

पहिल्याच ओव्हरमध्ये केकेआरचे १८ रन्स

ख्रिस लिन आणि सुनील नारायण ओपनिंग बॅट्समन

नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्जचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

आजच्या सामन्यावर कावेरीच्या वादाचे सावट