News Flash

IPL 2018: पृथ्वी शॉ धावबाद झाल्यामुळे दिल्लीच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

पृथ्वीने चेंडू थ्रो करताना पाहिले होते. पण तरीही त्याने क्रिजमध्ये परतण्याची घाई केली नाही. पृथ्वीच्या अशा बाद होण्यावर समालोचकही हेराण झाले होते.

पृथ्वी धावबाद झाल्यानंतर दिल्लीच्या नावे एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. image source IPL/BCCI

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात मुंबई इंडियन्सला अखेर अपयश आले. तळाच्या फलंदाजांनी प्रयत्नांची पराकाष्टा करूनही ते पराभूत झाले. परंतु, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या फलंदाजीवेळी वेगळाच प्रसंग पाहावयास मिळाला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि ग्लेन मॅक्सवेल सलामीला उतरले होते. पृथ्वीने २ चौकार लगावून आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले होते. परंतु, त्याचा आळस त्याच्या खेळीला अडसर ठरला. कदाचित त्याला याची जाणीव झाली असेलही. तिसऱ्या षटकात मॅक्सवेलने थर्डमनकडे शॉट खेळला. चेंडू थेट थर्डमनला उभारलेल्या हार्दिक पांड्याच्या हातात गेला. मॅक्सवेलने धाव काढण्यास मनाई केली. तोपर्यंत पृथ्वी खूप पुढे आला होता. तो माघारी परतलाही. परंतु, त्याचा आळस इथे नडला. अत्यंत सुस्तपणे परत येताना हार्दिकने टाकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. पृथ्वी यात बाद झाला.

दरम्यान, पृथ्वी धावबाद झाल्यानंतर दिल्लीच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. या हंगामात दिल्लीकडून धावबाद होणारा पृथ्वी हा दहावा फलंदाज ठरला आहे. ही आकडेवारी इतर संघांपेक्षा जास्त आहे.

विशेष म्हणजे पृथ्वीने चेंडू थ्रो करताना पाहिले होते. पण तरीही त्याने क्रिजमध्ये परतण्याची घाई केली नाही. पृथ्वीच्या अशा बाद होण्यावर समालोचकही हैराण झाले होते. पृथ्वी पुन्हा एकदा असा बाद झाला तर त्याने पुन्हा या स्तरावरच्या क्रिकेटमधून बाहेरच पडावे, अशी टिप्पणी सायमन डुलने केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 9:41 pm

Web Title: ipl 2018 dd vs mi points table prithvi shaw strange run out
Next Stories
1 IPL 2018 Live Updates KXIP Vs CSK: चेन्नईचा सफाईदार विजय
2 IPL 2018 DD Vs MI: बेन कटिंगची झुंज व्यर्थ, मुंबई प्ले ऑफमधून बाहेर
3 दिल्ली जिंकण्याचे मुंबईचे लक्ष्य!
Just Now!
X