02 December 2020

News Flash

IPL 2018 – कगिसो रबाडाच्या जागी लियाम प्लंकेटची दिल्ली डेअरडेविल्समध्ये वर्णी

पाठीच्या दुखापतीमुळे रबाडाने घेतली होती माघार

उपलब्ध खेळाडूंच्या यादीतून प्लंकेटची निवड

पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या कगिसो रबाडाऐवजी दिल्ली डेअरडेविल्स संघाने, इंग्लंडच्या लियाम प्लंकेटची संघात निवड केली आहे. आतापर्यंत प्लंकेटने इंग्लंडकडून १३ कसोटी, ६५ वन-डे आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत. मात्र आयपीएलमध्ये खेळण्याची प्लंकेटची ही पहिलीच वेळ असणार आहे. रबाडाने माघार घेतल्यानंतर उपलब्ध खेळाडूंच्या गटातून प्लंकेटची निवड करण्यात आलेली आहे.

अकराव्या हंगामासाठी दिल्ली डेअरडेविल्स संघाने राईट टू मॅच कार्ड वापरत रबाडासाठी ४.२ कोटी मोजत त्याला आपल्या संघात कायम राखलं होतं. मात्र आयपीएलच्या अकराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच रबाडाला पाठदुखीमुळे माघार घ्यावी लागली होती. नवीन हंगामात दिल्लीचा संघ ८ एप्रिलरोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 4:14 pm

Web Title: ipl 2018 delhi daredevils replace kagiso rabada with liam plunkett
टॅग IPL 2018
Next Stories
1 Video: CSKच्या अँथम साँगमध्ये धोनीचा जबरदस्त अंदाज
2 नवीन हंगामात चेन्नईतून आयपीएलचे सामने हद्दपार? राजकीय पक्षांचा सामने खेळवण्यास विरोध
3 आयपीएलच्या नव्या पर्वाला प्रारंभ
Just Now!
X