12 August 2020

News Flash

IPL 2018 – ‘कॅप्टन केन’ची फलंदाजीत चमक, अनोखा विक्रम केला आपल्या नावावर

अंतिम फेरीत केन विल्यमसनची आश्वासक फलंदाजी

हैदराबादला अंतिम फेरीत पोहचवण्यात केन विल्यमसनचा महत्वाचा वाटा

आयपीएलच्या अकराव्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनने एका अनोख्या विक्रमाची आपल्या नावावर नोंद केली आहे. आयपीएलच्या एकाच हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणारा विल्यमसन पाचवा फलंदाज ठरलेला आहे. चेन्नईविरुद्ध अंतिम सामन्यात खेळत असताना विल्यमसनने हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या या कर्णधाराने अंतिम फेरीत ३६ चेंडूंमध्ये ४७ धावा पटकावल्या. त्याच्या या खेळीमध्ये ५ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.

अंतिम फेरीतल्या या आक्रमक खेळीसोबत विल्यमसनने, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, माईक हसी या खेळाडूंच्या पंक्तीत प्रवेश मिळवला आहे. अंतिम फेरीतली खेळी पकडून केन विल्यमसनने यंदाच्या आयपीएलमध्ये ७३५ धावा केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2018 9:16 pm

Web Title: ipl 2018 kane williamson becomes 5th player to reach 700 runs in a season
Next Stories
1 IPL 2018 – दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग … काय आहे योगायोग?
2 वॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा ‘सन’सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग
3 IPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम…
Just Now!
X