News Flash

IPL 2018 Live Updates KXIP Vs CSK: चेन्नईचा सफाईदार विजय

लुंगिसानी एन्गिडी आणि सुरेश रैना चमकले

बाद फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघ उत्सुक असतो. किंग्ज इलेव्हन पंजाबही त्यास अपवाद नाही.

सुरेश रैनाने केलेल्या तडाखेबाज अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई  सुपर किंग्ज संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबला पाच विकेट व पाच चेंडू राखून हरवले. त्यामुळे पंजाबचे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीत स्थान मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. चेन्नईने १४ सामन्यांअखेर १८ गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले.

गहुंजे येथील खेळपट्टी द्रुतगती गोलंदाजांना पोषक ठरली. त्याचा लाभ घेत लुंगिसानी एन्गिडीने (४/१६) पंजाबच्या डावाचा कणाच मोडला, तरीही करुण नायर याच्या झंझावती अर्धशतकामुळे पंजाबला १९.३ षटकांत सर्वबाद १५३ धावांपर्यंत पोहोचता आले. मनोज तिवारी व डेव्हिड मिलर यांनीही त्यामध्ये वाटा उचलला. विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य चेन्नईने १९.१ षटकांत व पाच गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. त्यामध्ये रैनाच्या नाबाद ६१ धावा तसेच दीपक चहारने केलेल्या झंझावती ३९ धावांचा सिंहाचा वाटा होता.

चेन्नईची सुरुवात खराब झाली. भरवशाचा सलामीवीर अंबाती रायुडू केवळ एक धाव काढून बाद झाला. डावाच्या पाचव्या षटकांत अंकित रजपूतने फॅफ डय़ू प्लेसिस (१४) व सॅम बिलिंग्ज (०) यांना बाद करीत चेन्नईची ३ बाद २७ अशी स्थिती केली. साहजिकच चेन्नईच्या धावांच्या वेगावरही अंकुश घातला गेला. पहिल्या दहा षटकांत त्यांच्या जेमतेम ३ बाद ५८ धावा झाल्या होत्या. पंधराव्या षटकांत दीपक चहारने लागोपाठ दोन षटकार ठोकून कंटाळलेल्या प्रेक्षकांना खेळाचा आनंद मिळवून दिला. या षटकांत चेन्नईने २१ धावा वसूल करून खेळाचा रंग पालटवला. चहारने एक चौकार व तीन षटकारांसह ३९ धावा केल्या. त्याने संघास विजयाच्या दृष्टीपथात आणले. रैनाने त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने विजय मिळवला.

धडाकेबाज खेळाबद्दल ख्यातनाम असलेल्या ख्रिस गेल व के.एल.राहुल यांना झटपट बाद करीत पंजाबच्या डावाला खिंडार पाडले.  दुसऱ्या बाजूने दीपक चहारने आरोन फिंचला तंबूत धाडले. व तिवारी यांनी ३ बाद १६ अशा दयनीय स्थितीतून पंजाबचा डाव सावरला. षटकामागे सहा धावांचा वेग ठेवत त्यांनी धावफलक हालता ठेवला. या जोडीने ७.१ षटकांत ६० धावांची भागीदारी रचली. तिवारीने ३५ धावा करताना तीन चौकार व एक षटकार अशी फचकेबाजी केली. मिलरने एक चौकार व एक षटकारासह २४ धावा केल्या. मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्यामुळे पंजाबचा डाव पुन्हा अडचणीत सापडला. करुण नायर व अक्षर पटेल यांनी शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांत उत्तुंग फटकेबाजी करीत संघाची घसरगुंडी थोपवण्याचा प्रयत्न केला. नायरने तीन चौकार व पाच षटकारांसह ५४ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

किंग्ज इलेव्हन पंजाब : १९.४ षटकांत सर्व बाद १५३ (करुण नायर ५४; लुंगिसानी एन्गिडी ४/१०) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १९.१ षटकांत ५ बाद १५९ (सुरेश रैना नाबाद ६१ , दीपक चहार ३९; अंकित राजपूत २/१९ )

LIVE UPDATES:

 • चेन्नईचे ४० धावात तीन गडीत तंबूत
 • पाचव्या षटकात राजपूतने सलग दोन चेंडूंवर टिपले दोन गडी. डुप्लेसिस १४ धावांवर तर बिलिंग्ज शून्यावर बाद
 • मोहित शर्माच्या गोलंदाजीवर फॉर्मात असलेला अंबाती रायडू एक धावसंख्येवर बाद
 • चेन्नईला पहिला धक्का, अंबाती रायडू बाद
 • पंजाबचा डाव १९.३ षटकांत १५३ धावांवर संपुष्टात
 • के के नायरचे अर्धशतक
 • ब्राव्होने मिलरचा २४ धावांवर त्रिफळा उडवला.
 • जम बसलेल्या मनोज तिवारीला रवींद्र जडेजाने टिपले. ३५ धावांवर धोनीने टिपला झेल
 • नगिडीच्या भेदक चेंडूवर राहुलचा त्रिफळा उडाला. राहुलला अवघ्या ७ धावाच करता आल्या.
 • अॅरोन फिंचही स्वस्तात बाद. चार धावांवर चहरने केले बाद. रैनाने झेल घेतला
 • वेगवान गोलंदाज नगिडीच्या चेंडूवर गेल शून्यावर बाद. धोनीने यष्टीमागे टिपला झेल
 • पंजाबकडून फॉर्मात असलेला के एल राहुल आणि रन मशिन ख्रिस गेल मैदानात
 • चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 8:27 pm

Web Title: ipl 2018 live updates kings xi punjab vs chennai super king match 56 latest news
Next Stories
1 IPL 2018 DD Vs MI: बेन कटिंगची झुंज व्यर्थ, मुंबई प्ले ऑफमधून बाहेर
2 दिल्ली जिंकण्याचे मुंबईचे लक्ष्य!
3 पंजाबला ‘गेल वादळ’ तारणार?
Just Now!
X