ऋषभ पंत (८५ धावा) आणि श्रेयस अय्यर (५२ धावा) यांच्या भागिदारीमुळे दिल्लीला १७४ धावांचा टप्पा गाठता आला. अखेरच्या टप्प्यात पंतने केलेली फटकेबाजीमुळे दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पंतने आपल्या खेळीत तब्बल ७ षटकार ठोकले. त्याला अय्यरने सुरेख साथ दिली. तत्पूर्वी गौतम गंभीर आणि जेसन रॉय या सलामीच्या जोडीला चमक दाखवता आली नाही. चाचपडत खेळत असलेल्या कर्णधार गौतम गंभीरला उमेश यादवने स्वस्तात टिपले. त्याला फक्त ३ धावा करता आल्या. तर रॉयही ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या पंत आणि अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरला. बेंगळुरूकडून चहलने २ गडी टिपले. उमेश यादव, कोरी अँडरसन, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.

तत्पूर्वी राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे दोन्ही संघ आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या तळाच्या स्थानांवर आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात साधारण सुरुवात करणारे हे दोन्ही संघ विजयासह कात टाकण्यासाठी उत्सुक आहेत.

 

UPDATES:

  • बेंगळुरूची सलामीची जोडी फोडण्यात दिल्लीला यश, मनन व्होरा २ धावांवर बाद, मॅक्सवेलने केले बाद
  • बेंगळुरूकडून चहलने २ गडी टिपले. उमेश यादव, कोरी अँडरसन, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.
  • २० षटकांत दिल्लीच्या ५ बाद १७४ धावा
  • कोरी अँडरसनने पंतचा बळी घेतला.
  • पंतची आक्रमक खेळी अवघ्या ४८ चेंडुत ८५ धावा. ७ षटकार ६ चौकारांचा पाऊस
  • चहलनेच ग्लेन मॅक्सवेलला स्वस्तात टिपले. अवघ्या ४ धावांवर मॅक्सवेल बाद
  • वॉशिंग्टन सुंदरने अय्यर-पंतची जोडी फोडली. अय्यरला ५२ धावांवर मोहम्मद सिराजच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
  • श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतने डाव सावरला.
  • जेसन राॅयही ५ धावांवर बाद, चहलने त्रिफळा उडवला.
  • दिल्लीच्या चार षटकांत एक बाद १२ धावा.
  • सुरूवातीपासूनच चाचपड खेळत असलेल्या गंभीरला उमेश यादवने चहलकरवी झेलबाद केले. गंभीरला १० चेंडूत ३ धावाच करता आल्या.
  • दिल्लीकडून जेसॉन रॉय आणि गौतम गंभीर सलामीची जोडी मैदानात
  • नाणेफेक जिंकून आरसीबीचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय