02 December 2020

News Flash

Video: CSKच्या अँथम साँगमध्ये धोनीचा जबरदस्त अंदाज

आज आयपीएलच्या ११व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्जच्या अँथम साँगचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

Video: CSKच्या अँथम साँगमध्ये धोनीचा जबरदस्त अंदाज

दहा वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपरकिंग्जचं पुनरागमन होत असल्याने त्याची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज (शनिवारी) आयपीएलच्या ११व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्यापूर्वी या ‘येलो ब्रिगेड’नं त्यांचा अँथम साँग प्रदर्शित केला आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत कर्णधार एम.एस. धोनीचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे.

चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंसोबत धोनी ‘व्हिसल पोडू’च्या तालावर नाचताना पाहायला मिळत आहे. ‘व्हिसल पोडू’ हा चेन्नई सुपरकिंग्जचा अँथम साँग असून चाहत्यांमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे. CSKच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या दर्जेदार खेळाचा मनमुराद आस्वाद लुटला जाणार आहे. यजमान मुंबईच्या कामगिरीपेक्षा दोन वर्षांनंतर लीगमध्ये खेळणाऱ्या चेन्नईकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 1:30 pm

Web Title: ipl 2018 ms dhoni stars in csk new whistle podu anthem
Next Stories
1 नवीन हंगामात चेन्नईतून आयपीएलचे सामने हद्दपार? राजकीय पक्षांचा सामने खेळवण्यास विरोध
2 आयपीएलच्या नव्या पर्वाला प्रारंभ
3 ‘आयपीएल’साठी पाणी विकत घेणार का?
Just Now!
X