07 December 2019

News Flash

IPL 2018: मुंबई इंडियन्स अजुनही स्पर्धेत पुनरागमन करु शकते – रोहित शर्मा

मुंबईची सुरुवात चांगली नाही, मात्र आमचं आव्हान अद्यापही कायम- रोहित शर्मा

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा रोहित शर्मा

दहाव्या हंगामाचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची अकराव्या हंगामात फारशी चांगली सुरुवात झालेली नाहीये. बंगळुरुविरुद्ध मिळवलेला विजय सोडला तर मुंबईला सर्व सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. मात्र मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या परिस्थितीतही अजुन सकारात्मक आहे. मागच्या हंगामाप्रमाणे या हंगामातही मुंबई इंडियन्स पुनरागमन करु शकेल असा आत्मविश्वास रोहितने व्यक्त केला आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्सचा सनराईजर्स हैदराबादशी सामना होणार आहे.

“या हंगामात मुंबईची ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे, ती अजिबात चांगली नाही. मात्र माझ्यामते आम्ही अजुनही स्पर्धेत पुनरागमन करु शकतो. २०१५ सालच्या हंगामात मुंबईच्या संघाची अशाच पद्धतीने वाताहत झाली होती, मात्र त्यामधूनही सावरुन आम्ही पुनरागमन केलं.” पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रोहित शर्मा पत्रकारांशी संवाद साधत होता.

First Published on April 23, 2018 10:24 pm

Web Title: ipl 2018 mumbai indians can turn things around like in the past says skipper rohit sharma
Just Now!
X