26 November 2020

News Flash

IPL 2018: विराटने ‘तो’ झेल घेताच अनुष्काने दिली ‘प्राइजलेस रिअॅक्शन’

आरसीबीचा संघ विराट कामगिरी करु शकला नाही हे खरं. पण, या सामन्यात कर्णधार म्हणून विराटचा अफलातून खेळ पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना मिळाली.

विराट, अनुष्का

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली आयपीएलमध्ये उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला काही केल्या विजयाचा सूर गवसत नाहीये. रविवारी पार पडलेल्या सामन्यातही पुन्हा एकदा याचाच प्रत्यय आला. कोलकाता नाईट रायडर्स विरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यातही कोहलीचा संघ विराट कामगिरी करु शकला नाही. पण, या सामन्यात कर्णधार म्हणून विराटचा अफलातून खेळ पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना मिळाली हे खरं. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये उत्तम कामगिरी करत विराटने त्याचं क्रिकेट कौशल्य सर्वांनाच दाखवून दिलं. यावेळी अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्माही त्याला प्रोत्साहन देत असल्याचं पाहायला मिळालं.

केकेआर आणि आरसीबी या दोन संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटने घेतलेला एक झेप फक्त क्रीडा रसिकांना नव्हे, तर अनुष्कालाही भारावून गेला. १९ व्या षटकामध्ये तो झेल टिपत विराटने केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याला तंबूत परत पाठवलं. कार्तिकचा हा झेल पकडत विराटने आपल्या क्षेत्ररक्षणाचा अफलातून नमुनाच जणू सर्वांसमोर सादर केला. १९व्या षटकात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने एक जोरदार फटका मारला. संघाला विजय मिळवून देण्याच्या उद्देशाने अतिशय ताकदीने कार्तिकने तो फटका मारला होता. पण, चेंडू येत असणारी दिशा अचूकपणे हेरत विराटने त्याच दिशेने धाव घेतली आणि एक झेप घेत कार्तिकला झेलबाद केलं. २३ धावांवर कार्तिकला परत पाठवणाऱ्या विराटचा तो झेल पाहून अनुष्काच्या चेहऱ्यावरील भावही पाहण्याजोगे होते.

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

उत्तम फिटनेस आणि आत्मविश्वासाच्या बळावर विराटचा तो प्रयत्न यशस्वी ठरला जो पाहून त्याच्या पत्नीनेही भारावलेल्या मुद्रेत व्यक्त होत आणि टाळ्या वाजवत विराटचं कौतुक केलं. सोशल मीडियावर या सामन्यादरम्यान विशेषत: विराटने तो झेल घेतल्यानंतर व्यक्त झालेल्या अनुष्काचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 12:08 pm

Web Title: ipl 2018 rcb virat kohlis stunning catch brings out brilliant reaction from wife bollywood actress anushka sharma
Next Stories
1 दिल्लीच्या मार्गात बलाढय़ चेन्नईचा अडथळा
2 घरच्या मैदानावर बंगळुरु पुन्हा पराभूत, कोलकाता ६ गडी राखून विजयी
3 IPL 2018 – मुंबईविरुद्ध पराभवानंतर चेन्नई सुपरकिंग्जला धक्का, दिपक चहर दुखापतीमुळे संघाबाहेर
Just Now!
X