News Flash

IPL 2018, RCB vs SRH : बंगळूरूचा हैदराबादवर १४ धावांनी विजय; प्ले ऑफसाठी आशा कायम

सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

एबी डिव्हीलियर्स, मोईन अली आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने, घरच्या मैदानावर खेळताना हैदराबादसमोर विजयासाठी २१८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनच्या चांगलाच अंगलट आला. सलामीवीर पार्थिव पटेल व विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात यशस्वी ठरलेले हैदराबादचे गोलंदाज नंतर सपशेल अपयशी ठरले. डिव्हीलियर्स – मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन बंगळुरुच्या डावाला आकार दिला. दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. डिव्हीलियर्स – मोईन अली माघारी परतल्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने किल्ला लढवत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. हैदराबादकडून राशिद खानने ३ तर सिद्धार्थ कौलने २ फलंदाजांना माघारी घालवलं. संदीप शर्माने एका फलंदाजाला माघारी धाडलं.

त्यानंतर, बंगळूरूने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा सामना करताना हैदराबादचा संघ ३ बळींच्या बदल्यात २० षटकांत २०४च धावा करु शकला. त्यामुळे शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघावर १४ धावांनी विजय मिळवला. बंगळुरुसाठीचा आपल्या घरच्या मैदानावर झालेला हा या मोसमातील शेवटचा सामना होता. अपेक्षेप्रमाणे त्यांनी हा सामना जिंकून आपल्या चाहत्यांची मनेही जिंकली. या विजयामुळे प्ले ऑफमधील बंगळूरूच्या आशा कायम आहेत.

 • बंगळुरुचा हैदराबादवर १४ धावांनी विजय
 • हैदराबादचे सलामीवीर माघारी
 • अॅलेक्स हेल्स माघारी, मोईन अलीला मिळाला बळी
 • हैदराबादने ओलांडला ५० धावांचा टप्पा
 • युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद
 • हैदराबादची जमलेली जोडी फुटली, शिखर धवन माघारी
 • अॅलेक्स हेल्स – शिखर धवनची फटकेबाजी
 • हैदराबादच्या सलामीवीरांची आक्रमक सुरुवात
 • हैदराबादला विजयासाठी २१९ धावांचं आव्हान
 • २० षटकात बंगळुरुची २१८ धावांपर्यंत मजल
 • अखेरच्या षटकात कॉलिन डीग्रँडहोम माघारी, बंगळुरुचा सहावा गडी माघारी
 • मनदीप सिंह माघारी, सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर माघारी
 • बंगळुरुचे ४ गडी माघारी
 • राशिद खानच्या गोलंदाजीवर ठराविक अंतराने डिव्हीलियर्स – मोईन अली माघारी
 • मोईन अली-डिव्हीलियर्सची अर्धशतक
 • दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची शतकी भागीदारी
 • एबी डिव्हीलियर्स-मोईन खान जोडीने बंगळुरुचा डाव सावरला
 • बंगळुरुला दुसरा धक्का, राशिद खानच्या गोलंदाजीवर विराट त्रिफळाचीत
 • विराट-एबी कडून फटकेबाजीला सुरुवात
 • विराट कोहली-एबी डिव्हीलियर्स जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • पहिल्याच षटकात बंगळुरुला धक्का, पार्थिव पटेल माघारी
 • हैदराबादने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 8:02 pm

Web Title: ipl 2018 rcb vs srh live updates
टॅग : IPL 2018,Rcb
Next Stories
1 IPL 2018 – एबी डिव्हीलियर्सच्या तिसऱ्या मुलाचं भारतीय नाव ऐकलं का?
2 आयपीएलमध्ये रणजी खेळाडूंचं पितळ उघडं पडलं – सुनील गावसकर
3 IPL 2018 – ‘RCB ने धोका दिला’ म्हणणारा ख्रिस गेल आता म्हणतो…
Just Now!
X