News Flash

IPL 2018 RR vs KXIP Live Updates: राजस्थानला गोलंदाजांनी तारले, पंजाबचा १५ धावांनी पराभव

पंजाबतर्फे लोकेश राहुलने नाबाद ९५ धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही

पंजाबच्या फलंदाजांवर राजस्थानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन लगाम लावला. 

सलामीवीर जोस बटलरने केलेल्या धडाकेबाज ८२ धावा व त्याला फिरकीपटू कृष्णप्पा गौतमची लाभलेली सुरेख साथ या बळावर राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला १५ धावांनी धूळ चारली. या विजयामुळे राजस्थानने रविवारी झालेल्या लढतीतील पराभवाचा वचपा काढतानाच संघाचे स्पर्धेतील आव्हान टिकवले आहे. राजस्थानने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकांत ७ बाद १४३ धावाच बनवू शकला.

पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर ख्रिस गेल अवघी एक धाव काढून गौतमच्या फिरकीवर चकला. यानंतर धक्कादायक निर्णय घेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा कर्णधार रविचंद्रन अश्विन २ चेंडूंत एकही धाव न काढता गौतमच्याच गोलंदाजीवर माघारी परतला. लोकेश राहुलने एका बाजूने संघर्ष सुरू ठेवताना आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ७० चेंडूंत ११ चौकार व दोन षटकारांसह नाबाद ९५ धावा केल्या.

त्याआधी, राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोरदार सुरुवात केली. बटलर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अवघ्या ३.४ षटकांत ३७ धावांची सलामी दिली. एकीकडे फलंदाज बाद होत असताना बटलर मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजांवर हल्ले करत होता. त्याने संजू सॅमसनसह तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत संघाचा डोलारा सांभाळला. बटलरने नऊ चौकार व एका षटकाराच्या बळावर ५८ चेंडूंत ८२ धावा फटकावल्या. पंजाबतर्फे अँड्रय़ू टायने सर्वोत्तम गोलंदाजी करताना ३४ धावांत ४ बळी टिपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2018 7:57 pm

Web Title: ipl 2018 rr vs kxip live updates 2
टॅग : IPL 2018,Rr
Next Stories
1 IPL 2018 – आज ख्रिस गेल हा विक्रम करणार का? तुम्हाला काय वाटतं?
2 IPL 2018 – स्पर्धा मध्यावरच सोडून इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतणार
3 मोठ्या भावाने पकडला झेल; इरफान म्हणाला …
Just Now!
X