गेल्या दहा वर्षांमध्ये क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा आयपीएल, आता जगभरात आपल्या राजेशाही थाटासाठी ओळखली जाते. खेळाडूंवर लागणाऱ्या कोट्यवधींच्या बोली, संघमालकांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्ट्या, मैदानात सामन्यादरम्यान प्रत्येक चौकार-षटकारादरम्यान बेभान होऊन नाचणाऱ्या चीअरलिडर्स या सर्व कारणांसाठी आयपीएलने घराघरांमध्ये आपली जागा बनवली आहे. विशेषकरुन मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन आणि खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देणं हे चीअरलिडर्सचं काम असतं.

चार तास रंगणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये एका कोपऱ्यात उभं राहुन नाचणाऱ्या चीअरलिडर्सचा पगार किती असतो याबाबत कोणी कधी विचार केला आहे का?? प्रत्येक चीअरलिडर्स ही दरसामन्याला ६ ते १२ हजार रुपयांची कमाई करते. ही रक्कम प्रत्येक संघमालकाच्या मर्जीनुसार ठरवली जाते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता नाईट रायडर्सच्या चीअरलिडर्स सर्व संघांमध्ये श्रीमंत असल्याचं दिसून आलं आहे. कोणत्या संघाच्या चीअरलिडर्स किती पैसे कमावतात यावर एक नजर टाकणार आहोत.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
Hardik Emotional After Third Defeat
MI vs RR : ‘आम्ही लढत राहू आणि पुढे…’, सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट व्हायरल
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान
IPL 2024 CSK vs GT Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
IPL 2024, SRH vs MI: हार्दिकच्या मुंबईसमोर पॅट कमिन्सच्या हैदराबादचे आव्हान, वाचा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

१) दिल्ली डेअरडेविल्स –

आतापर्यंतच्या आयपीएल हंगामांमध्ये दिल्ली डेअरडेविल्सचा संघ एकदाही स्पर्धेचं विजेतेपद मिळवू शकलेला नाहीये. मात्र दिल्ली संघाची मालकी असलेला GMR उद्योगसमुह हा आपल्या चीअरलिडर्सना प्रत्येक सामन्याला अंदाजे ९ हजार ७०० रुपये देतं. आयपीएलमधील ५० हुन अधिक सामन्यांचं गणित लक्षात घेता दिल्लीच्या चीअरलिडर्स एका हंगामात अंदाजे २.५० ते २.६० लाखांची कमाई सहज करतात.

२) चेन्नई सुपरकिंग्ज –

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ अशी ओळख असलेला चेन्नईचा संघ हा प्रेक्षकांचाही लाडका आहे. इंडिया सिमेंट्स यांच्या मालकीचा असलेला हा संघ आपल्या चीअरलिडर्सना प्रत्येक सामन्यात अंदाजे साडेनऊ ते दहा हजार रुपये देतो. एका हंगामाअखेर चेन्नईच्या चीअरलिडर्स अंदाजे २.५० लाखांची कमाई करतात.

३) सनराईजर्स हैदराबाद –

२०१६ साली स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाने आपल्या अष्टपैलू खेळाने आयपीएलमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सर्वसाधारणपणे काळ्या व नारिंगी रंगाच्या कपड्यांमध्ये वावरणाऱ्या या संघाच्या चीअरलिडर्सनाही प्रत्येक सामन्याला अंदाजे १० हजार रुपये मिळतात. कलानिधी मारन यांच्या सन ग्रुपकडे हैदराबादच्या संघाची मालकी आहे. एका हंगामाअखेरीस हैदराबादच्या चीअरलिडर्सही २.५० लाखांची कमाई करतात.

४) किंग्ज इलेव्हन पंजाब –

कामगिरीत सातत्य असलेल्या पंजाबच्या संघाच्या चीअरलीडर्स बहुतांश वेळा पांढऱ्या कपड्यांमध्ये मैदानात येतात. प्रिती झिंटा आणि वाडीया समुहाची मालकी असलेला हा संघ आपल्या चीअरलिडर्सना प्रत्येक सामन्यात साडेनऊ हजार ते दहा हजार रुपये मोजतो. या संघाच्या चीअरलिडर्सही प्रत्येक हंगामाच्या शेवटी अंदाजे अडीच लाख रुपये कमावतात.

५) राजस्थान रॉयल्स

चेन्नई संघाप्रमाणेच स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगुन राजस्थानच्या संघाने पुनरागमन केलं आहे. रॉयल ब्ल्यू रंगाच्या कपड्यांमध्ये मैदानात नाचणाऱ्या चीअरलिडर्सना इतर संघाच्या चीअरलिडर्सच्या तुलनेत जास्त रक्कम मिळते. राजस्थानचं संघ प्रशासन आपल्या चीअरलिडर्सना ११,५०० ते १२००० हजार रुपये मोजतं. एका हंगामात राजस्थानच्या चीअरलिडर्स अंदाजे सव्वा तीन लाखांची कमाई करतात.

६) मुंबई इंडियन्स

चेन्नईपाठोपाठ आयपीएलमध्ये प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीचा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. मुकेश अंबानी यांच्या मालकीचा असलेला हा संघ आपल्या खेळाडूंप्रमाणे चीअरलिडर्सचीही खास काळजी घेतो. प्रत्येक सामन्यासाठी मुंबईच्या चीअरलिडर्सना अंदाजे ६ हजार ८०० रुपये मिळतात. याचसोबत मुंबईचा संघ जिंकल्यास अंदाजे ६,५०० रुपयांचा बोनसही दिला जातो. याव्यतिरीक्त पार्टी आणि इव्हेंटमध्ये काम केल्याचेही या संघाच्या चीअरलिडर्सना पैसे मिळतात. एका हंगामानंतर मुंबईच्या चिअरलिडर्स अंदाजे ८ लाख २० हजार रुपये कमावतात.

७) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु –

आयपीएलमध्ये सर्वात ग्लॅमरस म्हणून बंगळुरुच्या चीअरलिडर्सकडे बघितलं जातं. आयपीएलमध्ये बंगळुरुचा संघ फारशी चमकदार कामगिरी करु शकला नसला तरीही संघ व्यवस्थापन आपल्या चीअरलिडर्सची चांगली काळजी घेतं. प्रत्येक सामन्याला मिळणारी ६ हजार ८०० रुपयांची रक्कम, सामना जिंकल्यानंतर मिळणारा बोनस व इव्हेंटमधून अंदाजे सव्वातीन हजार रुपये या संघांच्या चीअरलिडर्सना मिळतात. हंगामाअखेरीस या चीअरलिडर्स सव्वापाच लाखांची कमाई करतात.

८) कोलकाता नाईट रायडर्स –

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याच्या मालकीचा संघ असलेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलमध्ये चीअरलिडर्सला सर्वाधिक पैसे देण्यासाठी ओळखला जातो. प्रत्येक सामन्यासाठी कोलकात्याच्या चीअरलिडर्स अंदाजे १९ ते २० हजार रुपये कमावतात. याव्यतिरीक्त कोलकात्यालाच्या चीअरलिडर्सना बोनस म्हणून साडेसहा हजार रुपये मिळतात. यानुसार कोलकात्याच्या चीअरलिडर्स आयपीएमध्ये सर्वात श्रीमंत चीअरलिडर्स ठरतात. हंगामाअखेरीस कोलकात्याच्या चीअरलिडर्स अंदाजे १४ लाख रुपये कमावतात.