23 February 2019

News Flash

Video : …आणि विराट झाला भावनिक!

बंगळुरूच्या स्पर्धेतील 'एक्झिट'नंतर विराटने आज चाहत्यांसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूच्या संघाला प्रतिष्ठेला साजेसा खेळ करता आला नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूच्या संघाला १४ पैकी केवळ ६ सामने जिंकता आले. त्यामुळे संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. बंगळुरूच्या स्पर्धेतील ‘एक्झिट’नंतर विराटने आज चाहत्यांसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत विराट आपल्या चाहत्यांना भावनिक पातळीवर साद घालत आहे. आपला संघ चांगले प्रदर्शन करू न शकल्याने तो आपल्या चाहत्यांची माफी मागत असून पुढील वर्षी चांगली कामगिरी करण्याचे आश्वासन तो देत आहे.

तुम्ही एक तर जिंकता किंवा काहीतरी शिकता, हा गोष्टीवर माझा विश्वास आहे. आम्ही यंदाच्या आयपीएलमध्ये जिंकण्याचे खूप प्रयत्न केले आणि आमचे सर्वस्व झोकून दिले. पण आम्हाला प्ले ऑफ फेरी गाठता आली नाही. पण पुढच्या हंगामात आम्ही नक्कीच दमदार पुनरागमन करू, असे त्याने ट्विटदेखील केले आहे.

हा पहा व्हिडीओ –

First Published on May 24, 2018 8:29 pm

Web Title: kohli tweets emotional message and video for rcb fans