28 February 2021

News Flash

IPL 2018 : कोण ठरणार ‘रॉयल’ ? संजू सॅमसनचा तडाखा , बंगळुरुपुढे 218 धावांचे लक्ष्य

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज आयपीएलच्या दोन 'रॉयल' संघांदरम्यानची लढत सुरू आहे. विराट कोहलीच्या बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.

संजू सॅमसनच्या नाबाद ४५ चेंडूत ९२ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे अजिंक्य रहाणेच्या राजस्थान संघाने विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला 218 धावांचे लक्ष्य दिले आहे. ९२ धावांच्या खेळीत संजू सॅमसनने केवळ २ चौकार लगावले पण तब्बल १० षटकारांची पाऊस पाडला.  बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज आयपीएलच्या दोन ‘रॉयल’ संघांदरम्यानची लढत सुरू आहे. विराट कोहलीच्या बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण जमा आहेत. गुणतालिकेत बेंगळुरू पाचव्या तर राजस्थान सहाव्या स्थानी आहे. प्रथम फलंदाजी करणा-या राजस्थान संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या झटपट खेळीच्या बळावर चांगली सुरूवात केली. मात्र, संघाच्या ४९ धावा झाल्या असताना रहाणे आणि डी’आर्की शॉर्ट ही जोडी फुटली. त्यानंतर संजू सॅंसनने सामन्याची सुत्रं आपल्या हाती घेतली आणि चौकार शतकांची आतषबाजी आतषबाजी करत नाबाद राहून सॅमसनने संघाची धावसंख्या निर्धारीत  २१७ पर्यंत पोहोचवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 4:48 pm

Web Title: match updates ipl 2018 rcb vs rr
Next Stories
1 IPL 2018 : सनरायजर्स हैद्राबादचा कोलकाता नाईट रायडर्सवर पाच गडी राखून विजय
2 मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅटट्रीक, दिल्लीच्या जेसन रॉयची आक्रमक खेळी
3 पुणे पालिकेकडे अतिरिक्त पाणीपुरवठय़ाची मागणी करणार का?
Just Now!
X