News Flash

IPL 2018 – कोलकात्याच्या ‘होम ग्राऊंड’वर मुंबईचं पारडं जड

आयपीएलच्या साखळी फेरीतील मुंबई आणि कोलकाता यांच्यादरम्यानचा दुसरा सामना आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे.

आयपीएलच्या साखळी फेरीतील मुंबई आणि कोलकाता यांच्यादरम्यानचा दुसरा सामना आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकात्याला १३ धावांनी मात दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात पराभवाचा वचपा काढण्याची कोलकात्याकडे चांगली संधी आहे. पण, मुंबईच्या संघाचा इतिहास, त्यांचा फॉर्म आणि ईडन गार्डन्सवरील कर्णधार रोहित शर्माची कामगिरी पाहता कोलकात्याला हा विजय सहजासहजी मिळणार नाही.

मुंबईच्या संघाची हंगामातील सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईने एकूण १० सामन्यांपैकी ६ सामने गमावले. त्यामुळे आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. पण, प्रतिकूल परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करण्याबाबत मुंबई इंडियन्सचा इतिहास सर्वश्रुत आहे. २०१४ सालच्या आयपीएल हंगामात मुंबईने शेवटच्या ६ पैकी ५ सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. आणि यंदाच्या हंगामातही त्यांची गेल्या २ सामन्यांमधील कामगिरी पाहता ते त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या वाटेवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

मुंबईचा १७ – ५ असा यशस्वी इतिहास

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत या दोन संघांमध्ये झालेल्या एकूण सामन्यांपैकी तब्बल १७ सामने मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर आहेत. तर कोलकाता संघाने केवळ ५ सामने जिंकले आहेत. याशिवाय, रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईने कोलकात्याविरोधात सलग ७ वा विजय मिळवत आपली यशस्वी घोडदौड सुरूच ठेवली आहे.

जर आजच्या सामन्यातही मुंबईने कोलकात्यावर विजय मिळवला, तर दोन्ही संघाचे ११ सामन्यांमध्ये १० गुण होतील. सोमवारी हैदराबादने बंगळुरूवर विजय मिळवला आणि १६ गुणांसह बाद फेरीतील आपला प्रवास जवळपास निश्चित केला आहे. दुसरीकडे चेन्नई १४ गुणांसह आणि पंजाब १२ गुणांसह बाद फेरीत पात्र ठरण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. अशा परिस्थितीत आज कोलकात्याच्या सामना गमावला. तर त्यांची स्थिती खूपच अडचणीची होऊ शकते.

ईडन गार्डन्सवर रोहितचे दमदार रेकॉर्ड

ईडन गार्डन्स हे जरी कोलकात्याचे होम ग्राउंड असले, तरी या स्टेडियमवरील मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याची कामगिरी जोरदार आहे. या स्टेडियमवर खेळताना रोहितने वन-डे, टेस्ट आणि टी२० अशा तीनही प्रकारात शतक ठोकले आहे. तसेच, मुंबईला पहिलेवहिले आयपीएल विजेतेपदही रोहित शर्माने याच मैदानावर मिळवून दिले होते. सध्या रोहित शर्मा चांगल्या लयीत नसल्यामुळे आपल्या आवडत्या मैदानावर चांगला इतिहास कायम राखून लयीत परतण्याची सुवर्णसंधी त्याला आज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2018 11:34 am

Web Title: mi is heavy weight in kkrs eden gardens
Next Stories
1 IPL 2018 RR vs KXIP Live Updates: राजस्थानला गोलंदाजांनी तारले, पंजाबचा १५ धावांनी पराभव
2 IPL 2018 – आज ख्रिस गेल हा विक्रम करणार का? तुम्हाला काय वाटतं?
3 IPL 2018 – स्पर्धा मध्यावरच सोडून इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतणार
Just Now!
X