29 May 2020

News Flash

व्हिडिओ : इडन गार्डन्स मैदानावर एक चाहता एम. एस. धोनीच्या पाया पडला

चाहत्याला तातडीने हटवण्यात आले मात्र या गोष्टीची चर्चा चांगलीच रंगली

क्रिकेटचा देव कोण असे विचारले तर कोणीही पटकन म्हणेल की सचिन तेंडुलकर! मात्र आयपीएलच्या स्पर्धेत गुरुवारी रंगलेल्या सामन्यात एका चाहत्याने चटकन येऊन महेंद्र सिंग धोनीचे पाय धरले. धोनीच्या पायाला स्पर्श करून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. इडन गार्डन्स मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट राइडर्स या दोन संघांमध्ये आयपीएलचा सामना रंगला. या सामन्यात कोलकाता टीमचा विजय झाला असला तरीही धोनीच्या पाया पडण्यासाठी आलेल्या या चाहत्याच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा झाली. महेंद्र सिंग धोनी हा असा क्रिकेटपटू आहे ज्याच्या कारकिर्दीत भारताने विश्वचषक जिंकला. त्याने भारतीय टीमला आकार देण्याचेही काम त्याच्या खुबीने केले आहे.

आयपीएलच्या स्पर्धांची धूम सुरु आहे. अशात महेंद्र सिंग धोनीला सर्वाधिक पसंती मिळते आहे. अर्थातच त्याच्या असण्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचीही चांगली चर्चा होते आहे. चेन्नईची मॅच अनेक क्रीडा रसिक त्या संघात धोनी आहे म्हणून पाहण्यासाठी येतात किंवा टीव्हीवर पाहतात. एम. एस. धोनीचा खेळ पाहण्यासारखा असतोच.. मात्र महत्त्वाची असते ती त्याची स्ट्रॅटेजी. त्याच्यातल्या याच अंगभूत गुणांबाबत आदर व्यक्त करण्यासाठी हा चाहता त्याच्या जवळ आला. त्याने चटकन धोनीचे पाय धरले, धोनीनेही त्याच्या पाठीवर हात फिरवला. तितक्यात सुरक्षा रक्षक तिथे आले आणि या चाहत्याला लांब घेऊन गेले. या आशयाचा व्हिडिओच आयपीएलच्या ट्विटर हँडलने ट्विट केला आहे.

पाहा व्हिडिओ

 

महेंद्रसिंग धोनीचे पाय त्याच्या चाहत्यांनी धरण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना सुरु असतानाही एक चाहता थेट मैदानात शिरला आणि त्याने धोनीचे पाय धरले आणि आपला आदर व्यक्त केला. या चाहत्याला पोलिसांनी दूर केले. याच घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. क्रिकेट विश्वात धोनीची लोकप्रियता किती आहे हेच सांगणारे हे बोलके दृश्य ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2018 5:10 am

Web Title: ms dhoni fan makes his way to dugout to touch idols feet watch video
Next Stories
1 IPL 2018 मुंबईची पंजाबशी गाठ
2 शुभमन गिलच्या धडाकेबाज खेळीमुळे कोलकाता टीमचे कोरबो लोडबो जितबो रे!
3 IPL 2018 : शुभमन गिलच्या खेळीमुळे कोलकाता नाइट रायडर्सचा चेन्नई सुपरकिंग्जवर विजय
Just Now!
X