07 April 2020

News Flash

हार्दिकने थ्रो केलेला चेंडू लागल्याने इशान किशनच्या डोळयाला दुखापत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर सामना सुरु असताना हार्दिक पांडयाने थ्रो केलेला चेंडू डोळयावर लागल्याने यष्टीरक्षक इशान किशन जखमी झाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर सामना सुरु असताना हार्दिक पांडयाने थ्रो केलेला चेंडू डोळयावर लागल्याने यष्टीरक्षक इशान किशन जखमी झाला. सामन्याच्या १२ व्या षटकामध्ये ही घटना घडली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एक धाव घेतली. त्यावेळी हार्दिकने चेंडू इशांतच्या दिशेने फेकला. इशानला थ्रो चा अंदाज घेता न आल्याने तो चेंडू थेट त्याच्या उजव्या डोळयावर आदळला. यावेळी इशानने हेल्मेट घातले नव्हते.

चेंडू इतका जोरात बसला कि, इशान कळवळत जमिनीवर झोपला. त्यानंतर लगेच फिजिओला मैदानावर बोलावण्यात आले. इशानला दुखापतीमुळे त्यावेळी मैदानावर खेळणे शक्य नसल्याने त्याने मैदान सोडले. इशान मैदानावर कोसळल्यामुळे एक क्षण सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. पण नंतर तो स्वत: उठून उभा राहिल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला. इशान मैदानाबाहेर जात असताना वानखेडेवरच्या प्रेक्षकांनीही प्रोत्साहन देत त्याचा हुरुप वाढवला.

इशान किशनने मैदान सोडल्यानंतर त्याच्या जागी राखीव यष्टीरक्षक आदित्य तरेने यष्टीरक्षणाची जबाबदारी संभाळली. इशान मैदानाबाहेर जाताना त्याला झालेली जखम दिसत होती. इशानची दुखापत नेमकी किती गंभीर आहे ते अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. अवघ्या १९ वर्षांचा असलेला इशान किशन झारखंडकडून स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 11:36 pm

Web Title: mumbai indians vs royal challengers banglore ipl
टॅग Ipl,Rcb
Next Stories
1 IPL 2018 MI vs RCB Live Match Updates: हिटमॅनच्या तडाख्याने मुंबईचा बंगळुरुवर ‘रॉयल’ विजय
2 Video: हैदराबादच्या खेळाडूंना फ्लाइटमध्ये असा त्रास देतोय शिखर धवन
3 मोहम्मद शमीला कोलकाता पोलिसांचं समन्स, आयपीएल मध्यावर सोडून हजर व्हावं लागणार?
Just Now!
X