News Flash

पाकिस्तानी पंचाने विराटवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला …

क्रिकेटविश्वात सर्वोत्तम फलंदाजाचे नाव विचारल्यास चाहते पटकन विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, केन विल्यमसन अशी निरनिराळी नावे घेतात.

पाकिस्तानी पंचाने विराटवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला …

सध्याच्या घडीला क्रिकेटविश्वात सर्वोत्तम फलंदाजाचे नाव विचारल्यास चाहते पटकन विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, केन विल्यमसन अशी निरनिराळी नावे घेतात. पण एका पाकिस्तानी पंचाने मात्र या बाबतीत थोडे वेगळे मत व्यक्त केले आहे.

पाकिस्तानी पंच अलीम दार यांनी सर्वोत्तम फलंदाज हा फक्त विराट कोहलीच असून फलंदाजीत कोहलीच्या आसपास कोणीही नाही, असे म्हटले आहे. अलीम दार हे एक अनुभवी आणि ज्येष्ठ पंच असून आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये त्यांचा समावेश आहे. आयसीसीचा २००९, २०१० आणि २०११च्या सर्वोत्तम पंच पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, विराट कोहली हा वन-डे, कसोटी आणि टी२० अशा तीनही प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज आहे. अनेक फलंदाज विराट कोहलीच्या स्टाईलची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. पण माझे असे मत आहे की आताच्या घडीला कोणताही फलंदाज विराटच्या जवळपासही नाही.

भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या चाहत्यांची संख्या असंख्य आहे. रोज त्याच्या चाहत्या वर्गात वाढ होत असतेच. अलीम दार यांनी विराटवर स्तुतीसुमने उधळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2018 4:51 pm

Web Title: pakistani umpire aleem dar praises virat kohli
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 …म्हणून विराट कोहली ‘ग्रेट प्लेयर’ – गॅरी कर्स्टन
2 Video – IPL 2018 धोनीचा कानमंत्र, ‘माझ्यासारखा लांब सिक्स मारायचा असेल तर हे करा…’
3 IPL 2018 … म्हणून राजस्थानचा संघ घालणार गुलाबी जर्सी
Just Now!
X