भारत आणि नजिकच्या देशांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेल्या ‘आयपीएल’ने भविष्यकाळासाठी रणनिती ठरवलेली आहे. आगामी वर्षांमध्ये आयपीएल अमेरिका, युरोप आणि आखाती देशांमध्ये आयपीएलचा प्रसार करण्याच्या तयारीत आहे. भारतात ज्या शहरांमध्ये आयपीएलचं आयोजन होतं नाही, तिकडे आम्ही फॅन पार्क उभारतो. या माध्यमातून सुमारे २० ते ३० हजार लोकं सामन्यांना आनंद घेतात. हाच प्रकार आम्ही भविष्यात परदेशांमध्ये आजमावून पाहणार आहेत. असोसिएट प्रेसला दिलेल्या माहितीत राजीव शुक्ला यांनी माहिती दिली आहे.

दहा हंगाम पूर्ण झाल्यानंतर अकराव्या हंगामातील सामन्यांनाही प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली आहे. इंग्लिश प्रिमीअर लीग नंतर सर्वाधिक प्रेक्षक पसंती मिळणारी आयपीएल ही दुसरी लीग असल्याचं मत नुकतच आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे परदेशात आयपीएलचा प्रसार केल्यास, क्रिकेटला त्याचा फायदाच होणार असल्याचं मत शुक्ला यांनी व्यक्त केलं. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलच्या प्रक्षेपण हक्कांसाठी वाहिन्या ज्या प्रकारे पैसा ओतत आहेत ते पाहता परदेशातही आयपीएलला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचं मत शुक्ला यांनी व्यक्त केलंय.