23 September 2020

News Flash

IPL 2018: मुंबईच्या पराभवाने प्रिती झाली झिंगाट, व्हिडीओ व्हायरल

मुंबई इंडियन्स फायनलमध्ये न गेल्याचा मला खूप आनंद आहे असं प्रिती झिंटा बोलताना दिसत आहे.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीगमधील (२०१८) वाटचाल रविवारी साखळीतच संपृष्टात आली. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये झगडणाऱ्या मुंबईने अखेरच्या समान्यांमध्ये आशादायी कामगिरी करत बाद फेरीच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र दिल्ली डेअरडेव्हिल्सने अखेरचा सामना तीन चेंडू आणि ११ धावांनी जिंकत मुंबईच्या आव्हानापुढे पुर्णविराम दिला. यासोबतच प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चारही संघांची नावं समोर आली आहेत. ५६ सामन्यांनंतर सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स टॉप चार संघ म्हणून पात्र झाले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब अपात्र ठरले आहेत. रविवारी चेन्नईसोबत झालेल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर पंजाबचा प्रवास संपला. मात्र यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रिती झिंटा अत्यंत आनंदी दिसत आहे. सामना सुरु असतानाचा हा व्हिडीओ आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रिती झिंटा पंजाबच्या एका स्टाफ सदस्याशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओत ऑडिओ नसला तरी प्रिती झिंटा काय बोलत आहे याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. मुंबई इंडियन्स फायनलमध्ये न गेल्याचा मला खूप आनंद आहे असं प्रिती झिंटा बोलताना दिसत आहे. अनेकांनी यावरुन प्रिती झिंटाला ट्रोल केलं आहे.

चेन्नई आणि पंजाबदरम्यान झालेल्या सामन्यानंतर प्रिती झिंटाने टॉप चार संघांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तीन वेळा खिताब जिंकला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकू शकलेला नाही. यावेळीही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं त्यांचं स्वप्न चेन्नईसोबत झालेल्या सामन्यानंतर भंगलं. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना फक्त चेन्नईचा पराभव करायचा नव्हता, तर १०० धावांच्या आत ऑल आऊट करायचं होतं. पण पंजाबला ते शक्य झालं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2018 11:23 am

Web Title: preity zinta video is going viral
Next Stories
1 धोनीने रचला नवा विक्रम पण दिनेश कार्तिककडून धोका
2 कर्णधारपद सोडण्याच्या ‘गंभीर’ निर्णयावर दिल्लीचा कोच रिकी पॉन्टीगची प्रतिक्रिया
3 IPL 2018: ऋषभ पंतच्या ६८४ धावा, ६८ चौकार आणि ३७ षटकारांचा पाऊस
Just Now!
X