आयपीएलच्या ११ व्या मोसमातील पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ एकमेकांमध्ये भिडले. कोलकाता नाइट रायडर्सने २०२ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नव्हते. मात्र शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असतानाही चेन्नई सुपरकिंग्जने एवढे मोठे आव्हान संयमी खेळीच्या जोरावर पार करत स्पर्धेमधील सलग दुसरा विजय मिळवला. ४००हून अधिक धावांचा आणि षटकारांचा या समान्यात पाऊस पडला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. याच ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ म्हणता येईल अशा सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले त्याच विक्रमांवर टाकलेली ही नजर…

>
८८ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स आंद्रे रसेलने आपल्या खेळीत तब्बल ११ षटकार ठोकले. आपल्या 88 धावांच्या खेळीमध्ये त्यांने केवळ एक चौकार मारला. म्हणजेच त्याने ८८ पैकी ७० धावा केवळ १२ चेंडूंमध्ये ठोकल्या.

>
कोलकाता नाइट रायडर्सचा डाव अचानक गडगडू लागला असतानाच आंद्रे रसेल सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 88 धावांची खेळी केली. सातव्या क्रमांकाच्या फलंदाजाने आयपीएलमध्ये केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.

>
विशेष म्हणजे सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा करण्याचा याआधी विक्रम चेन्नईच्याच डेव्हेन ब्रावोने यंदाच्या मोसमातील पहिल्याच समान्यात केला होता. मुंबईविरुद्ध चेन्नईला विजय मिळवून देताना ब्रावोने ६८ धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अफगानिस्तानच्या मोहम्मद नबीच्या नावे आहे. नबीने आयर्लंडविरुद्ध ८९ धावा केल्या होत्या.

>
११ षटकार मारून सर्वात कमी धावा करण्याचा विक्रमही आंद्रे रसेलच्या नावे झाला आहे. याआधी २०१५ मध्ये रॉस व्हाइटले याने ११ षटकार मारून यॉर्कशायरविरुद्धच्या सामन्यात ९१ धावांची खेळी केली होती.

>
मागील सामन्यात फलंदाजीमुळे चेन्नईसाठी हिरो ठरलेल्या डेव्हेन ब्रावोला या समान्यात कोलकात्याच्या फलंदाजांची चांगला झोडपला. त्यामुळे आता गोलंदाज म्हणून एक नकोसा विक्रम ब्रावोच्या नावे झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणाऱ्या गोलंदाजाच्या यादीमध्ये ब्रावो पहिल्या स्थानी आला आहे. ब्रावोच्या गोलंदाजीवर आत्तापर्यंत १०७ षटकार मारण्यात आले आहेत. याआधी हा विक्रम प्रवीण कुमारच्या नावावर होता. प्रवीण कुमारच्या गोलंदाजीवर १०४ षटकार मारण्यात आले आहेत.

>
इतकी मोठी धावसंख्या उभारून पराभव होण्याची कोलकात्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी २०१० मध्ये कोलकात्याचे २०१ धावांचे आवाहन पंजाबने सहज पुर्ण केले होते. त्यानंतर कालच्या सामन्यात चेन्नईने हा विक्रम मोडत २०३ धावांचा यशस्वी पाठलाग करुन पाच गडी राखत सामना खिशात घातला.

>
या सामन्यात एकूण ४१ षटकार मारण्यात आले