News Flash

IPL 2018 : चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक

शेन वॉटसनची झुंजार शतकी खेळी

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांचा गहुंजे मैदानवरचा सामना महत्त्वाचा ठरला तो शेन वॉटसनच्या धडाकेबाज शतकी खेळीमुळे.चेन्नईकडून खेळताना शेन वॉटसनने ५१ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ९ चौकारांची आतषबाजी करत १०० धावा केल्या. सुरेश रैनाचा अपवाद वगळता ओपनिंगला आलेल्या सगळ्याच फलंदजांनी वॉटसनला म्हणावी तशी साथ दिली नाही. मात्र सुरुवातीपासून आक्रमक खेळी करणाऱ्या वॉटसनला आज चांगला सूर गवसला. त्याने आपल्या सुंदर खेळीचे दर्शन घडवत क्रिकेट रसिकांची मने जिंकली.

अंबाती रायडू, एम एस धोनी, सॅम बिलिंग्ज हे तिघेही पटापट बाद झाले. मात्र शेन वॉटसन खिंड लढवत राहिला. आक्रमक आणि झुंजार खेळी करत वॉटसनने आपल्या संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली. शेन वॉटसनच्या तडाखेबंद खेळीमुळेच चेन्नईला राजस्थान रॉयल्सविरोधात खेळताना २०० पेक्षा जास्त धावांची मजल मारता आली. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची पिसे काढत शेन वॉटसनने आपल्या आक्रमक आणि सुंदर खेळीचे दर्शन घडवले. कालच ख्रिस गेलने मोसमातले पहिले शतक झळकावत उपस्थितांची मने जिंकली होती. आता दुसऱ्या दिवशी शेन वॉटसनने नाबाद धावांची खेळी करत आपल्या संघाला २०४ धावांचा डोंगर रचून दिला. १०६ धावा करत वॉटसन झेलबाद झाला. मात्र त्याची ही खेळी स्मरणात राहिल अशीच होती यात काहीही शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 9:46 pm

Web Title: shane watson century against rajasthan royals
Next Stories
1 IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ६४ धावांनी विजय
2 डिव्हिलियर्स माझ्यापेक्षा कांकणभर सरसच – विराट कोहली
3 माझी निवड करुन विरेंद्र सेहवागने IPL स्पर्धा वाचवली – ख्रिस गेल
Just Now!
X