रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी पंजाबच्या संघाने दिलेले ८९ धावांचे माफक आव्हान बांगुरुच्या सलमीच्याच जोडीने पार केले आणि प्ले-ऑफ सामन्यातील आपली दावेदारी अधिक प्रबळ केली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद ४८ तर पार्थिव पटेलने नाबाद ४० धावा केल्या.

विराट कोहलीच्या ४८ धावांच्या खेळीमुळे विराटने कर्णधार म्हणून दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीर याचा एक विक्रम मोडीत काढला. कोहलीने काल केलेल्या ४८ धावांच्या खेळीमुळे त्याच्या आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळताना ३ हजार ५२५ धावा केल्या. त्याने गंभीरचा ३ हजार ५१८ धावांचा विक्रम मोडला.

दिल्लीच्या संघातून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर गौतम गंभीरने दिल्लीकडून एकही सामना खेळलेला नाही. या हंगामात गौतम गंभीरने केवळ ६ सामने खेळून ८५ धावा केल्या. तर विराटने १२ सामन्यांमध्ये ५१४ धावा केल्या. त्यामुळे विराटला गंभीरच विक्रम मोडणे काहीसे सोपे ठरले.

कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा ३ हजार ५२५ धावांच्या अव्वल आहे. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा गंभीरपेक्षा काहीच फरकाने चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या कर्णधार म्हणून खेळताना २ हजार २६९ धावा आहेत. या यादीत ‘टॉप ५’मध्ये केवळ डेव्हिड वॉर्नर हा एकमेव परदेशी कर्णधार असून तो २ हजार ९९ धावांसह पाचव्या स्थानी आहे.