आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाची घोडदौड स्वप्नवत सुरु आहे. हैदराबादने १० पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह प्ले-ऑफ फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. हैदराबाद संघाच्या या कामगिरीवर चाहतेदेखील खूष आहेत. मात्र या सगळ्या चाहत्यांमध्ये हैदराबादच्या सामन्यांत हजर राहून चीअर करणाऱ्या एका मुलीची चर्चा आहे.

हैदराबादच्या जवळपास सगळ्या सामन्यात ही मुलगी संघाचा उत्साह वाढवताना दिसते. कॅमेरामनदेखील सामन्यादरम्यान तिचे हावभाव टिपताना दिसतो. इतकेच नव्हे तर यापुढील हैदराबाद संघाच्या सामन्यांमध्येही ती मुलगी दिसण्याची अपेक्षा आहे. सनरायझर्स हैदराबादला चीअर करणारी ही मुलगी आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सन या एका प्रसिद्ध उद्योगसमूहाकडे हैदराबाद संघाचे सह-मालकत्व आहे. ती मुलगी याच उद्योगसमूहाचे संस्थापक असलेले कलानिथी मारन यांची कन्या काव्या मारन आहे. काव्या ही सन समूहाचा भाग असलेल्या सन म्युझिक आणि सन टीव्हीची असलेली एफएम चॅनेल्स यांच्याशी संबंधित आहे, असे सांगण्यात येत आहे. काव्याची आई कावेरी मारन या सन उद्योगसमूहाच्या सहव्यवस्थापकीय संचालक आहेत.

काव्याला क्रिकेटची खूप आवड आहे. २०१३ साली सनरायझर्स हैदराबाद संघाचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. तेव्हापासून काव्या स्टेडियममध्ये येऊन सामने पाहत आहे. तसेच, केन विल्यमसन याच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीवर ती खूष आहे.