News Flash

अबब…UAE मध्ये IPL आयोजनासाठी BCCI ने मोजले तब्बल *** कोटी, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

३ मैदानांवर पार पडले सामने, मुंबईने पटकावलं विजेतेपद

भारतासह जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. २९ मार्च रोजी सुरु होणारी स्पर्धा करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. पण स्पर्धा रद्द केल्यास बीसीसीआयला सुमारे ४ हजार कोटींचा फटका बसणार होता. त्यामुळेच बीसीसीआयने यासाठी स्पर्धा भारताबाहेर आयोजित करण्याचं ठरवलं. यासाठी बीसीसीआयला सर्वात आधी युएई आणि त्यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने प्रस्ताव दिला होता. बीसीसीआयने युएई क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव स्विकारत तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं.

अवश्य वाचा – IPL च्या नवीन हंगामाची तयारी सुरु, नवव्या संघासाठी अदानी ग्रुप शर्यतीत

१९ सप्टेंबरपासून युएईत तेराव्या हंगामाला सुरुवात झाली. शारजा, दुबई आणि अबु धाबी अशा ३ मैदानावंर हे सामने खेळवण्यात आले. मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने युएई क्रिकेट बोर्डाला १४ लाख अमेरिकन डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम) दिले आहेत. १० नोव्हेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेचच पुढच्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. पुढचा हंगाम भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आयपीएल २०२१ आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी युएई क्रिकेट बोर्डासोबत करार केला आहे.

अवश्य वाचा – केन विल्यमसन SRH ची साथ सोडणार?? कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणतो…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 3:48 pm

Web Title: 100 crore bcci paid a staggering amount to emirates cricket board for staging ipl 2020 psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL च्या नवीन हंगामाची तयारी सुरु, नवव्या संघासाठी अदानी ग्रुप शर्यतीत
2 केन विल्यमसन SRH ची साथ सोडणार?? कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणतो…
3 IPL च्या सर्वोत्तम संघात रोहित, विराट आणि राहुलला स्थान नाही
Just Now!
X